Ads

समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्यास कटिबद्ध राहीन: आ. प्रतिभा धानोरकर.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:- शहरातील प्रत्येक समाजाने धानोरकर परिवारावर सतत प्रेम केले आहे. या सर्वांच्या प्रेमापोटीच आम्हाला समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.यापुढेही समाजातील प्रत्येक घटकांसाठी धानोरकर परिवार प्रामाणिक राहून समाजाच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहील असे आश्वासन देत भविष्यातही आमच्यावर असेच प्रेम कायम राहू द्या असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
Will be committed to do justice to every section of the society: Mla. Pratibha Dhanorkar.
शहरातील भद्रनाग प्रभागात खासदार तथा भद्रावती नगरपरिषद निधीतून 28 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मुस्लिम समाज भवनाचे लोकार्पण मोठ्या थाटात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आ. प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुरज गावंडे, नगरसेवक हाजी जावेद शेख, नगरसेविका अनिता मुळे-गेडाम,उपअभियंता आर.एस. गुप्ता, एडवोकेट एम. आर. शेख, हाजी डॉक्टर शकील, बशीर भाई, सय्यद एजाज अली सिकंदर शेख,पप्पू शेख, अबू कुरेशी हमीद, भाई शाबू खान,मजह र भाई, मदिना मज्जिद चे मेहबूब खान पठाण तथा पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शहरातील मुस्लिम स्मशानभूमीत शेड उभारण्यासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. व आमदार यांच्या हस्ते सर्व मज्जित कमिटीचे अध्यक्ष यांना शाल व श्रीफळ देण्यात आले या समाजभवणाच्या निर्मितीमुळे परिसरातील गोरगरिबांची आवश्यक ते विविध कार्य या समाजभवनात अगदी अल्प दरामध्ये करणे शक्य होईल असा विश्वास नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी या समाज भावनाच्या निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या अन्य व्यक्तींचा सत्कारही करण्यात. आला सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मुनाज शेख यांनी समाजभवनासंबंधी सविस्तर माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुनाज शेख यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment