Ads

प्रहारचे तालुकाध्यक्ष डुकरे यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

चंद्रपूर ः आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर डुकरे यांच्यासह टेमुर्डा सर्कल येथील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाशी ध्येयधोरणे, पक्षसंघटन मजबूत करण्याचे आश्वासन या युवकांनी दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या या युवकांचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी काँग्रेसचा दुप्पटा देऊन स्वागत केले. Hundreds of youths joined the Congress party under the leadership of Dukare, the taluk president of Prahar.
वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडका सुरू केला आहे. गावागावात जाऊन तेथील गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाऊन घेत आहे. तातडीने समस्यांचा निपटारा करीत आहे. त्यांच्या या कार्याने प्रभावीत होऊन प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर डुकरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. नुकताच पार पडलेल्या एका छोट्याखानी कार्यक्रमात किशोर डुकरे यांच्यासह टेमुर्डा सर्कलमधील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये कोसरसारचे उपसरपंच गणेश मडावी, बोरगावचे ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण देवतळे, गुंजाळ्याचे सरपंच भाऊराव चौधरी, बोरगाव तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आकाश धवने, संदीप वासेकर, निखिल तिखट, अनिकेत झिले, संदीप वासेकर, ओमकार कांबळे, पवन बावणे, मुनेश्वर राऊत, विशाल कापरे, विनोद दडमल, आकाश डाखरे, आकाश डावणे, यशश्री आस्वले, प्रसाद मिलमिले, राहुल देठे, सतीश कनोजवार, अमोल डांबोली, प्रणय तिवारे, अमने, हर्षल चोपणे, देवाजी घोसरे, अजय ताजने, रितेश देवतळे, गिरीश वनकुटे यांच्यासह अन्य युवकांचा समावेश होता. या युवकांनी काँग्रेसचे पक्षसंघटन वाढविण्याचे आश्वासन दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment