तालुका प्रतिनिधी (भद्रावती) - तालुक्यातील चंदनखेडा येथे हार्डवेअर दुकानाच्या नावाखाली बियर, देशी, विदेशी दारू साठा ठेवून दारू विक्री करून अवैध्य बियर बार चालविणारा चंदनखेडा येथील माजी उपसरपंच्याला अवैध दारू सह अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारला गुन्हे अन्वेषण विभाग चंद्रपूर यांनी केली.Former Deputy Sarpanch's Illegal Beer Bar in Chandankheda Village.
मागील अनेक दिवसापासून चंदनखेडा हे गाव कोणत्या न कोणत्या कारणास्तव चर्चेत आहे चंदनखेडा हे गाव सांसद आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.
डेव्हिड बागेसर माजी उपसरपंच चंदनखेडा असे आरोपीचे नाव आहे आरोपी हे मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहे. चंदनखेडा येथील हार्डवेअरच्या दुकानांमध्ये बियर, देशी, विदेशी दारू पॅक पद्धतीने विक्री करत असल्याबाबतची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग चंद्रपूर यांना मिळाली त्या आधारे ७o हजाराचा दारू साठा जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डेव्हिड बागेसर यांच्यावर अवैध दारू विक्री प्रकरणात भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये बहुतांश गुन्हे दाखल आहे.
0 comments:
Post a Comment