Ads

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-सध्या राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या चर्चा उठत आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी कोट्यातून हे आरक्षण देऊ नये.त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशा आशयाचे निवेदन भद्रावती शहर व तालुका ओबीसी महासंघाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील तहसील कार्यालयामार्फत देण्यात आले आहे.
Give reservation to Maratha community without pushing OBC reservation.
त्याचप्रमाणे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शवण्यासाठी दिनांक 17 ला ओबीसी महासंघातर्फे चंद्रपूर येथे विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भद्रावती तालुका तथा शहरातील ओबीसी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन यावेळी तालुका तथा शहर ओबीसी महासंघातर्फे करण्यात आले आहे. ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा सहभाग असल्यामुळे आहे ते आरक्षण अपुरे आहे. अशातच ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार केलास तो ओबीसी बांधवांवर अन्याय होईल. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र ओबीसी कोट्यातून ते देऊ नये असेही निवेदनातून म्हटले आहे. निवेदन सादर करताना नगराध्यक्ष अनिल धानोरकर, पांडुरंग टोंगे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, लिमेश माणूसमारे, रवी नागपुरे दिलीप किशोर खंडाळकर, सुनिता खंडाळकर, आसवले काका, महेश ठेंगणे, प्रशांत झाडे दिलीप पारखी, आदी मान्यवर उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment