Ads

ग्राम पंचायती द्वारे होतोय नळाला दुशित पाणी पुरवठा

तालुका प्रतिनिधी भद्रावती :-
तालुक्यातील मौजा कोंडेगाव मा. येथील ग्रामपंचायती द्वारे घरघुती पिण्याच्या पाण्याच्या नळाला दुषित पाणी पुरवठा होत असुन येथील ग्रामपंचायत प्रशासन मौन बाळगून आहे.Contaminated tap water is supplied by Gram Panchayat
तालूक्याती मौजा कोंडेगाव मा. ग्रामपंचायत हि एकेकाळी निर्मल ग्राम म्हणून नावारूपास आलेली ग्राम पंचायत आहे या ग्रामपंचायती द्वारे पिण्याच्या पाण्याच्या नळाला दुषित पाणी पुरवठा केल्या जात असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. मौजा कोंडेगाव मा. येथे गावातील विहिरीचा पाणी पाणीपुरवठा योजनेच्या टाकी मार्फत गावात पाणी पुरवठा केला जातो परंतु ज्या विहिरीतून पाणी टाकी मध्ये भरल्या जातो त्या विहिरितच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. असा हा प्रकार मागील तीन ते चार महिन्या पासून सुरु आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असुन या दिवसामध्ये साथीचे रोग पसरण्याची दाट श्यक्याता असते . या बाबत ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला वारवार सुचना देवून सुध्या त्या विहिरीतील पसरलेली घाण साफ करण्याचे सत्कार्य करण्यासाठी मुहूर्त सापडला नाही. या. बाबत मागील महिन्याच्या ३१/०८/२०२३ रोजीच्या ग्राम सभेत गावातील लोकांनी पिण्याच्या पाण्या संदर्भात आपली समस्या मांडून आपला रोष व्यक्त केला असता त्या वेळेस तेथील सचिव श्री निमसरकार आणि उपसरपंच श्री रविंद्र घोडमारे यांनी मजूर लावून वि हीरीतील पक्ष्यांचे घरटे साफ करून त्या वर बारीक जाळी लावून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन दिल्याला जवळ जवळ १५ दिवसाचा
कालावधी लोटूनही विहीर साफ करण्याचा मुहूर्त सापडला नाही. आणि आचर्याची बाब म्हणजे या गावात वर्ष्याच्या १२ महिन्यातून फक्त ६ महिनेच पाणी पुरवठा केला जातो आणि नागरिकाकडून पूर्ण वर्ष पाणी कर घेतला जातो. अस असताना सुध्या काही दिवसा पासून गावातील काही भागातील पाईप लाइन बंद होती तेव्हा गावातील लोकांनी वर्गणी काडून x करतो असे म्हनल्या नंतर तबबल ३ वर्षा नंतर ग्राम पंचायत कडून ते दुरुस्त करण्यात आली. याच दुषित पाणी पुरवठा बाबत . दुषित पाण्या मुळे गावातील लोकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण. तेव्हा गावातील लोकांकडून शुद्य पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment