चंद्रपूर :- दिवंगत मीनाक्षी गुरु वाले फाउंडेशन व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूरच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोधी, पंचायत समिती कोरपणा, जिल्हा चंद्रपूर येथे शिक्षक दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन करण्यात आला.
On Teacher's Day, meritorious felicitated by Late. Meenakshi Guruwale Foundation
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सोलापन होते, कार्यक्रमाचे उद्घाटक पी एम सहानी, प्रमुख अतिथी ,तळोधी ग्रामपंचायत सरपंच ज्योती जनेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या नयना कापसे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे प्रचारक रामदास ताविडे, ज्येष्ठ प्रचारक अरविंद जी ठाकरे, उच्च प्राथमिक शाळा तळोधीचे मुख्याध्यापक रामुजी गावंडे, संतोष जुनघरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

दिवंगत मीनाक्षी मागील 13 वर्षांपूर्वी पंचायत समिती कोरपना अंतर्गत तळोदी या गावात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या व पुढे त्या मुख्याधपाक पदाची जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडत आणि त्या दरम्यानच्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त व ज्ञानदानाचे काम उत्कृष्टपणे करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात व शिस्तेमध्ये भर टाकत गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रती गोडी निर्माण करून यशस्वी विद्यार्थी घडविले. या कार्याची स्मृती जपत त्यांच्या जन्मदिनी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी गुरुवाले फाउंडेशन तर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार फाउंडेशन तर्फे आयोजित केला जातो. दिवंगत मीनाक्षी गुरुवाले या अत्यंत कडक शिस्तीच्या व प्रेमळ स्वभावाच्या म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होत्या. त्यांच्या आठवणी काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवल्या व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना भावूक झाल्या त्यांनी घडवलेल्या विद्यार्थी पैकी एक कृषी अधिकारी ,वकील, डॉक्टर, अभियंते गायक झाले. सदर विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रति प्रेम भावना व आपुलकी व्यक्त करताना, त्यामुळे आम्ही नवीन नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. अशा या शिक्षिके विषयी अनेक मान्यवरांनी मत व्यक्त केले, सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद तसेच गावातील नागरिक व गुरु वाले फाउंडेशनचे विकास गुरु वाले, भाग्यश्री खनके, राजेश्री कोसूरकर, विक्की गुप्ता यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे संचालन विनोद पन्नासे केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर आवारी यांनी मानले.
0 comments:
Post a Comment