तालुका प्रतिनिधी जावेद शेख:
चंद्रपूर नागपूर मुख्य मार्गावरील डाली पेट्रोल पंप जवळ असलेल्या महिलेला एसटी बसने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली ही घटना शुक्रवारला घडली.Female injured in the struck of ST bus
प्रणिता उमेश देवगडे वय ३५ वर्ष राहणार भंगाराम वार्ड असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. चंद्रपूर - यवतमाळ मार्गे जाणारी एसटी बस या मार्गाने जात असताना ही महिला गुरे हाकलत शेतातून मुख्य मार्गावर आल्याने ती एसटी बसच्या मागील चाकात सापडली त्यात ती गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment