तालुका प्रतिनिधी भद्रावती जावेद शेख:जिम्नॅस्टिकस हॉल जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपुर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिकस स्पर्धा मधे अंडर 19 बॉयस आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकस मधे भद्रनाग स्पोर्ट्स अकादमी , जिल्हा परिषद हायस्कूल,भद्रावती चा क्रिश भोस्कर ( वर्ग 12 वी )गोल्ड मेडल आणि अंडर 14 इयर्स बॉयस आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकस मध्ये आयुध स्पोर्ट्स अकादमी ,अंकुर विद्या मंदिर स्कूल ,आयुध निर्माणी चांदा चा *मास्टर दीक्षांत रामटेके ( वर्ग 06 वा), ला गोल्ड मेडल* प्राप्त झालेले आहे.Athletes of Bhadravati in Gymnastics at Divisional Level
भद्रावती तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच जिम्नॅस्टिकस क्रीडा प्रकारात आपल्या भद्रावती शहराला हा गौरव प्राप्त झालेला आहे.
या यशातून प्रेरणा घेऊन पुढे भविष्यात जिम्नॅस्टिकस या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात भद्रावती शहरातील खेळाडू उज्ज्वल कामगिरी करतील व आपल्या ऐतिहासिकभद्रावती शहराला जिम्नॅस्टिकस प्रकारामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त करून देईल अशी आमची अपेक्षा असल्याचे *चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे अध्यक्ष श्री आशुतोष गायनेवर, चेअरमन श्री नीलेश गुंडावार व उपाध्यक्ष ऍड राजरत्न पथाडे* यांनी व्यक्त केलेली आहे.
विजेत्या स्टुडंन्ट्स नि आपल्या यशाचे श्रेय *माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड सर* , जिल्हा जिम्नॅस्टिकस असोसिएशनचे उपाध्यक्ष *श्री वाल्मिक खोब्रागडे सर* , उपाध्यक्ष *प्रा. दुष्यंत नगराळे सर, सेक्रेटरी श्री दुर्गराज रामटेके, श्री युवराज धानोरकर, डॉ विशाल शिंदे, राजु हिवज, क्रीडा शिक्षक श्री पांडुरंग भोयर, श्री विकास दुर्योधन, निर्दोष दहिवले,संजय माटे, मनीष भागवत,श्रीहरी गसकंटी,किशोर ढवळे,गौतम भगत* यांना दिले.
0 comments:
Post a Comment