Ads

घोडपेठ - घोटनिंबाळा परिसरात वाघाची दहशत ; दोन जनावरांचा फडशा

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:तालुक्यातील घोडपेठ - घोटनिंबाळा शेतशिवारात वाघाने उच्छाद मांडला असून परिसरातील शेतात बांधून असलेल्या रेडा व वगारांना वाघाने आपले भक्ष्य बनवल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. Tiger terror in Ghodpeth-Ghotnimbala area; Two animal cages
घोडपेठ येथील शेतकरी अशोक माहुलकर यांची घोडपेठ - घोटनिंबाळा शिवारात शेती आहे. अशोक माहुलकर यांच्या शेतात बांधून असलेला नर हल्ल्या वाघाने हल्ला करत मारून टाकला आहे. तसेच जवळच असलेल्या घोट निंबाळा शेतशिवारात बांधून असलेले उपसरपंच डेविड रामटेके यांचे सुध्दा वगार वाघाने मारून टाकले आहे. दोघांच्या शेतीमध्ये अंदाजे ५०० मीटरचे अंतर आहे.

ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरात वाघाच्या पंजाचे निशाण दिसत आहेत. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती कळताच वनविभागाने घटनास्थळ गाठत पंचनामा केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment