Ads

भद्रावतीत दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर.

तालुका प्रतिनिधी भद्रावती जावेद शेख:-दिवंगत खासदार बाळू धानोरकर स्मृती प्रित्यर्थ शहरातील भोज वार्ड येथील वाल्मिकी गणेश मंडळातर्फे वाल्मिकी चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या समाजाप्रती असलेल्या भावना स्पष्ट केल्या.Blood donation camp in Bhadravati in memory of late MP Balu Dhanorkar.
या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष धानोरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज गावंडे नगरसेविका शितल गेडाम माजी नगरसेवक प्रमोद नागोसे प्रशांत झाडे तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
रक्त हे मानवी शरीरातच तयार होते ते कृत्रिमरीत्या बनविता येत नाही त्यामुळे आजच्या काळातील अपघाताचे प्रमाण पाहता रक्ताची आवश्यकता नेहमी भासत असते त्यामुळे तरुण वर्गाने रक्तदान करून आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपावी असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले अन्य मान्यवरांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले या आव्हानाला प्रतिसाद देत परिसरातील 60 युवकांनी रक्तदान केले रक्त संकलनासाठी नागपूर येथील आयुश रक्तपेढीच्या पथकाने सहकार्य केले शिबिराच्या यशस्वीते करता मंडळाचे अध्यक्ष विनोद गुळघाणे, शंकर होकम, सचिन पचारे, सनी धामदेरे,अमलाश कुमरे, संदीप कुमरे ,बाळू पतरंगे, सनी लोहकरे, अभिनय लोहकरे, लखन चटपलीवार, नेहाल हाडे ,विकास माधवी, मारोती माढरे, विनोद नागपुरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment