Ads

ध्येयवेड्या सोहमचे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले कौतुक!

चंद्रपूर - ‘नव्या पिढीमध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण करायची असेल, तर त्यांच्या गुणांचे कौतुक केले पाहिजे’, या तत्वावर विश्वास ठेवणारे राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच पुन्हा एकदा त्याची प्रचिती दिली. एका व्हिडियोमुळे संपूर्ण राज्यात लोकप्रिय झालेल्या ध्येयवेड्या सोहम उईके याच्या गुणांचे कौतुक करताना त्याला खास पुस्तकांची भेटही दिली.
Goal oriented Soham appreciated by Min.Sudhir Mungantiwar
पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा सोहम उईके याने अलीकडेच ना. श्री. मुनगंटीवार यांची भेट घेतली. सोहम आठव्या वर्गाचा विद्यार्थी असून त्याला आयएएस व्हायचे आहे. खरेतर सगळीच मुले बालपणी काही स्वप्न बघत असतात. पण ते स्वप्न गाठण्यासाठी काय करायचे असते, याची माहिती मुलांना नसते. सोहम उईके याला अपवाद आहे. तो आठव्या वर्गात असला तरीही आयएएस होण्यासाठी काय गरजेचे आहे, याचे ज्ञान त्याला आहे.

काही दिवसांपूर्वी त्याने आयएएस होण्याची जिद्द पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्याकडे बोलून दाखवली होती. त्यांनी त्याच्यासोबत झालेल्या गप्पांचा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आणि सोहमची जिद्द बघता बघता सर्वदूर व्हायरल झाली. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही ही त्याची माहिती आली. दरम्यान, सोहमच ना.मुनगंटीवार यांच्या भेटीला आला. दोघांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्या. या गप्पांमधून ना. श्री. मुनगंटीवार यांनी सोहमचे आवडते विषय जाणून घेतले. त्यात सोहमने इतिहास, राज्यशास्त्र व भुगोलाची आवड असल्याचे सांगीतले आणि खास करून, इतिहास हा विषय अधिक आवडतो असे सांगितले. त्यानंतर लगेच त्याच्या आवडीच्या विषयांची पुस्तके ना. श्री. मुनगंटीवार यांनी सोहमला भेट दिली. यावेळी प्रदेश महामंत्री महिला मोर्चा अल्का आत्राम, ज्योती बुरांडे माजी उपसभापती, धनराज सातपुते उपसरपंच,सोहमचे मामा उपस्थित होते.
*आनंद गगनात मावेना*
चक्क राज्याच्या वने व सांस्कृतिक मंत्री यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि एवढेच नव्हे तर आपल्या आवडीची पुस्तकेही भेट दिली… हा अनुभव घेताना सोहम उईकेचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी सोहमच्या कुटुंबियांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment