Ads

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यु

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही : दोघांना एका भरधाव अज्ञात वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना सिंदेवाही- मूल मार्गावर सिंदेवाहीपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील नवीन विरव्हा येथे सोमवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली. दादाजी शिवराम सावसाकडे (वय ६५) व उदालक केशव हजारे (५०) दोघेही रा. सरडपार चक (नवीन विरव्हा) ता. सिंदेवाही अशी मृतकांची नावे आहेत.
Two killed in collision with unknown vehicle
प्राप्त माहितीनुसार, सरडपार (नवीन विरव्हा) येथील दादाजी आणि उदालक हे दोघेहीआपल्या वैयक्तिक कामानिमित्त। सिंदेवाही- मूल मार्गावरील विरव्हा गावातील बसथांब्याजवळ आले. रस्त्याच्या बाजूने चालत असताना अचानक भरधाव आलेल्या वाहनाने दोघांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले. दोघेही रस्त्यावर पडून असताना सिंदेवाही पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहनातून दोघांनाही सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. सिंदेवाही प्रभारी पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment