तालुका प्रतिनिधी भद्रावती जावेद शेख:आम आदमी पक्षाच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यात दिनांक २ ऑक्टोबर २०२३ गांधी जयंती पासून ११ ऑक्टोबर २०२३पर्यत झाडू यात्रा" आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे उद्दिष्ट विदर्भातील सर्वसामान्य जनतेला पार्टीच्या धोरणांशी जोडणे आणि आगामी निवडणुकीसाठी तयारी करणे आहे. या यात्रेचे प्रारंभिक ठिकाण वर्धा जिल्ह्यातील गांधी आश्रम आहे. येथून रॅलीला सुरू होईल आणि 1830 किलोमिटर प्रवास करून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे यात्रेचा समारोप होईल.Aam Aadmi Party sweeps in Vidarbha from October 2
या यात्रेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मोठी सभा आयोजित केली जाईल. या सभांमध्ये आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल ईटालीया, महाराष्ट्र संघठन सचिव भूषण ढाकुलकर तसेच दिल्लीचे नेते आणि विदर्भ तसेच जिल्ह्यातील आपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आम आदमी पक्षाचे नेते सुनिल देवराव मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार व महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी प्रेस च्या माध्यमातून दिली.
त्यांनी सांगितले की,चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम आदमी पक्ष तळागाळात पोहोचविने करीता ही यात्रा वरोरा,भद्रावती सुरज शहा घुघुस अमीत बोरकर चंद्रपूर योगेश गोखरे बल्लारपूर रवि पप्पुलवार कोरपना, गडचा्ंदुर,राजुरा सुरज ठाकरे यांचे नेतृत्वात होईल व त्यानुसार आम आदमी पार्टी ने तयारी सुरू केली आहे.व आपचे कार्यकर्ते यात्रा सफल करन्याकरीता प्रयत्न करीत आहे.
शहरात रेली व सभा घेण्यात येईल . त्यामुळे सर्वसामान्य जनतेत एक आत्मविश्वास निर्माण होईल. आम आदमी पक्षाच्या या यात्रेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात नवीन चळवळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या माध्यमांतून सर्वसामान्यांचे संविधानिक हक्कांसाठी लढा, मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्या उज्वल भविष्यासाठी नियोजन, नागरिकांना दिल्लीसारख्या आधुनिक वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा देणे, शेत मालाला भाव, तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना २४ तास वीपुरवठा, शेतकरी सुरक्षा जंगली जनावरे बंदोबस्त, प्रत्येक शेताला पांधन रस्ते, वीज, पाणी आदी मुद्दे यातून मांडण्यात येतील.
आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, ही यात्रा विदर्भातील जनतेला एकत्र आणण्याचा आणि त्यांना एक नवीन दिशा देण्याचा एक प्रयत्न आहे.
या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेने आपला सहभाग नोंदवावा व जनतेच्या हितासाठी काम करना-या
पार्टी ला सहकार्य करावे असे आवाहन आम आदमी पार्टी तर्फे प्रेस च्या माध्यमातून करन्यात आले.
0 comments:
Post a Comment