भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती तालुक्यातील कान्सा शिरपूर या गावात जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यालयाच्या जल जीवनमार्फत नव्या पाण्याच्या टाकीसाठी अगदी अंगणवाडी जवळच दहा ते बारा फूट खोल खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे या खड्ड्यात तुडुंब पाणी भरलेले आहे. त्यामुळे पाण्याने भरलेल्या या खड्ड्यामुळे लगतच्या अंगणवाडीतील लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे."That" pit at Kansa Shirpur is becoming dangerous for students.
Anganwadi workers demand to take measures.
या धोकाची सूचना येथील अंगणवाडी सेविकांद्वारे ग्रामपंचायतीला व संबंधित ठेकेदारास अनेकदा सूचना देण्यात आली. मात्र त्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन यावर उपाययोजना करून एखादी भविष्यात होणारी अनुचित घटना टाळावी अशी मागणी अंगणवाडी सेविका सुमित्रा मते व मदतनीस विभा देवगडे यांनी केली आहे. सदर अंगणवाडीत गावातील लहान मुले शिक्षणासाठी येत असतात या अंगणवाडी लगतच हा दहा ते बारा फूट खोल खड्डा पाण्याची टाकी बांधण्यासाठी खोदून ठेवण्यात आला असून सध्या काम बंद करण्यात आले आहे. पावसामुळे या खड्ड्यात पूर्णपणे पाणी भरले असून या खड्ड्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबद्दल ग्रामपंचायतीला व ठेकेदाराकडे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.एखादी अनुचित घटना घडण्याआधी यावर उपाययोजना करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांतर्फे करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment