Ads

नागपूर रोडवरील वाढते अतिक्रमण हटविण्याची मागणी

चंद्रपूर (का.प्र): येथील नागपूर रोड छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याला जोडणारी मुख्य रस्ता असताना सुध्दा या मार्गावर सर्वाधिक अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणामुळे अपघातांची शक्यता बळावली आहे. या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी सूज्ञ नागरिकांनी केली आहे.
Demand to remove increasing encroachment on Nagpur Road
नागपूर मार्गावरील उडाण पुलावर व मार्गावरील पिलरला धडक मारून हायवा व ट्रकचे अपघात झालेले असून अनेकांचा जीव गेलेला आहे. असे असताना सुध्दा मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अशी ओरड जनमानसात सुरु आहे.

याच मार्गावरून मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, आयुक्त, अधीक्षक अभियंता जात असतात पण सदर अतिक्रमणाकडे लक्ष कसे नाही हा चर्चेचा विषय आहे. सर्वात मोठा अपघाताचा स्पॉट ठरलेल्या जुना वरोरा नाका पासून ते बापट नगर व त्याच्या पुढे अतिक्रमणाचे माहेरघर आहे. या मार्गावर सर्वाधिक अतिक्रमण वाढत आहे. नियमानुसार पूटपाथ च्या 25 फूट नंतर दुकाने असावयास पाहिजे पण येथील नियम धाब्यावर बसवून अतिक्रमण करण्यात आलेले आहे. या अतिक्रमणाला राजकीय पुढाऱ्यांचे शह असल्याची सुद्धा चर्चा आहे.

मिळालेल्या माहिती नुसार एखाद्या अतिक्रमणाची तक्रार केली असली राजकीय पुढाऱ्यांनी तक्रार केली तर थातूरमातूर तेवढेच अतिक्रमण हटविण्यात मनपा अतिक्रमण पथक कारवाई करते व दुसरीकडे लक्ष देत नसून मनपा अतिक्रमण हटाव पथक भेदभाव करत असल्याची नागरिकामध्ये चर्चा आहे.

तसे पाहता जून महिना डिसेंबर महिना व मार्चच्या प्रारंभी मनपा विभाग रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खानापूर्ती करन असते. पण पुन्हा 'जैसे थे' अशी परिस्थिती निर्माण होते. यावरून अतिक्रमण हटविल्या जाते की पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी 'सेटिंग' केली जाते असा प्रश्न सहजच पडतो. अतिक्रमण हटविण्यासाठी कोणी कारवाई करायला गेल तर 'हमारी पहुंच उपर तक है अशी सुधा काही टपरी चालविणारे धमकी देत असल्याचे समजते.

चंद्रपूर शहर महानगरपालिका झाल्यानंतर 'स्वच्छ शहर सुंदर शहरे' असे स्लोगन (घोषवाक्य)
चित्रकला स्पर्धा- घेऊन मनपा ने पेंटिंग केलेले आहे. पण या वाढत्या अतिक्रमणामुळे मात्र स्वच्छ शहर सुंदर शहर या घोषवाक्याला काळिमा फासला आहे.

चंद्रपूर शहराला विद्रूप करणाऱ्या, 'स्वच्छ शहर सुंदर शहर' ला काळिमा फासणाऱ्या अनेक अपघातांची मालिका ठरलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment