भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील 27 वर्षांचा तरुण शेतकरी चेतन भोयर याने सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्याकडे पाच एकर शेती आहे.
मागील दोन तीन वर्षांपासून त्याला सतत नापिकीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आदिवासी सहकारी सोसायटी कडून घेतलेल्या कर्जाची रक्कम त्याला फेडणे अशक्य झाले. सततच्या नापिकीला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याने बुधवारी रात्री गळफास घेत जीवनयात्रा संपवली. तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात शोककळा पसरली आहे.
0 comments:
Post a Comment