Ads

शहरातील मुख्य रस्त्यांवरून पोलिसांचे पथ संचलन

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:ईद व गणेश विसर्जन लक्षात घेता पोलीस प्रशासनातर्फे शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवरून पथसंंचलन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी,तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बीपीन इंगळे, पीएसआय अमोल कोल्हे, पीएसआय किटे नगरपालिकेचे कर्मचारी रासेकर यांनी गवराळा येथील तलावावरील विसर्जन स्थळाला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची व पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.
Police route-march on main roads in the city
शहरातील भद्रावती पोलीस ठाणे नाग मंदिर बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार आदी रस्त्यांवरून पोलीस प्रशासनातर्फे पथसंंचलन करण्यात आले. या पथसंंचालनामध्ये भद्रावती पोलीस तथा होमगार्ड सहभागी झाले होते. ईद व गणेश विसर्जन हे जवळपास एकत्र आल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील गवराळा येथील विसर्जन स्थळावर सुरक्षिततेचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. दरम्यान स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी सोबत ठाणेदार यांनी शहरातील विसर्जन स्थळाला भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची व पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली व ईद आणि गणेश भक्ताच्यानागरिकांना केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment