Ads

समाजातील वंचित घटकांना काँग्रेसच न्याय देऊ शकेल- आमदार प्रतिभा धानोरकर.

तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-
केंद्रातील व राज्यातील भाजप शासनामुळे समाजातील दलित व वंचित वर्गामध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे .या सर्व घटकांना सुरक्षितता देऊन त्यांचे उत्थान केवळ काँग्रेस पक्षच करू शकतो असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. भद्रावती शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मचक्र अनुवर्तन समिती तर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी बँक ऑफ इंडिया परिसरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आमदार धानोरकरांच्या उपस्थितीत मसाला भाताचे वितरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे विनय बोधी डोंगरे , सुधीर खोब्रागडे,नगरसेविका रेखा खोटेमाटे, सरिता सूर, प्रतिभा सोनटक्के, शितल गेडाम, अनिता मुळे, कविता सुपी, आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
Only Congress can give justice to the deprived sections of the society - MLA Pratibha Dhanorkar.
याप्रसंगी एडवोकेट भूपेंद्र रायपुरे खुशाल मेश्राम डॉक्टर अमित नगराळे नितीन देवगडे ,महेंद्र गावंडे आधी सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
शहरातील डॉ. आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मालार्पण करून शहरातील प्रमुख रस्त्याने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बाबासाहेबांच्या आठवणीला उजाळा देणारे तथा छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू, ज्योतिबा फुले, तथागत गौतम बुद्धांसह अनेक पुरुषांचे आठवण देणारे चित्ररथ सहभागी करण्यात आले होते .ढोलताशांच्या निना दात,आकर्षक फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून परत आंबेडकर चौकात परतल्यानंतर भोजनदानाने रॅलीची सांगण्या करण्यात आली. सदर रॅलीत बौद्ध बौद्ध बांधव ,भगिनी तथा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मसाला भात वितरणाच्या यशस्वीतेकरिता प्रमोद नागोसे, प्रशांत झाडे, निखिल राऊत ,संदीप कुंमरे, महेश कोथळे, सुनील पारशिवे , रितेश वाढइ, आशिष कार्लेकर, रुपेश मांढरे ,पिंटू मरसकोल्हे, आदींनी मोलांचे सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment