Ads

विवाहितेचा छळ प्रकरणी व जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्या प्रकरणी आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

सोलापूर प्रतिनिधी : विवाहितेचा छळ करून व जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्या प्रकरणे आरोपी नामे आकाश शिवाजी आनंदी आणि सुनीता शिवाजी आनंद रा. जुना बोरामणी नाका रविवार पेठ सोलापूर यांना मे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Pre-arrest bail granted to the accused in the case of torture of married and forced conversion
वरील प्रकरणात फिर्यादीचा विवाह 5/04/2022 रोजी आरोपी आकाश शिवाजी आनंद यांच्यासोबत लग्न झाले होते लग्न झाल्यापासून फिर्यादीस ख्रिश्चन धर्म स्वीकारावा व त्या धर्मानुसार राहावं असे म्हणून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले तसेच घरात देवपूजा करू नको, रक्षाबंधन साजरा करू नको, सकाळी लवकर उठत जा,वगैरे कारणावरून आणि फिर्यादीस वारंवार शिवीगाळ व मारहाण आरोपीच्या वतीने नेहमी सुरूच होते. तरी वरील प्रकरणात फिर्यादी कडून तिच्या बँक खात्यातून 1.50 लाख रुपये व सोने चांदीचे दागिने काढून घेऊन नवीन घर घेण्यासाठी वडिलांकडून आणखी पैसे घेऊन ये असे म्हणून फिर्यादीस शारीरिक मानसिक त्रास केलेला होता व अशा आशयाची फिर्याद जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. यात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे. न्यायालयाने मंजूर केला आहे. यात आरोपी तर्फ ॲड कदीर औटी,ॲड हजरतअली बडे खान,ॲड. इकबाल शेख,ॲड. तनवीर इंडीवाले व ॲड. दत्तात्रेय कापुरे यांनी काम पाहिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment