Ads

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेस 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ...नितीन राव

चंद्रपूर:-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणारी २०२३-२४ ची सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती व पाठ्यपुस्तक योजना इत्यादी योजनेचा लाभ घेण्याकरिता मंडळाने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 आक्टोंबर २०२३ ठेवण्यात आली होती. Maharashtra Labor Welfare Board's scholarship scheme extended till December 31...Nitin Rao
परंतु अजूनही काही विद्यापीठांच्या,महाविद्यायलाचा निकाल घोषित झाला नाही व काहींची मार्कशीट मिळाली नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे मंडळाच्या लक्षात आले.या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कल्याण आयुक्त मा.रविराज इळवे यांनी यावर तात्काळ निर्णय घेऊन वरील सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली असे एका परिपत्रकाद्वारा कळविण्यात आले आहे तेंव्हा शिष्यवृत्ती योजनेस मुदतवाढ दिलेल्या दिनांकपर्यंत अर्ज करून विद्यार्थ्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा असे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र रहाटे ,देवराव कोंडेकर व नितीन राव सामाजिक कार्यकर्ते यांनी कळविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment