Ads

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई.

जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती :-अवैध रेतीची वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडले, याची माहिती महसूल विभागाला देण्यात आल्यानंतर भद्रावती तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या आदेशांतर्गत तालुक्यातील काटवल तुकुम परिसरात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी सात वाजता कारवाई केली व सदर ट्रॅक्टर भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
Action against tractors transporting illegal sand
तालुक्यातील चंदनखेडा, पारोधी, काटवल परिसरात अवैध रेती तस्करांनी मोठा धुमाकूळ घातला असून या भागात ते मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध तस्करी करीत आहे. रेतीची अवैध तस्करी करीत असलेल्या अशाच एका ट्रॅक्टरला काटवल तुकुम येतील गावकऱ्यांनी पकडले व याची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या आदेशानुसार तलाठी मस्के यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून त्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले. याबाबतचा पुढील तपास महसूल विभाग करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment