Ads

बंदुकीची गोडी छताच्या टीना ला फोडून घरात शिरली

जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती:-नेहमीप्रमाणे लोक नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असतानाच अचानक मोठा आवाज झाला. आणि घराचे टिनाचे छत फोडून एक बंदुकीची गोळी चक्क घरात शिरली. सदर घटना तालुक्यातील देऊळवाडा या गावात घडली. सुदैवाने या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.The firearms the sweet roof of the tina and entered the house
गावाजवळच तीन किलोमीटर अंतरावरील शहरातील विजासन टेकडी जवळ पोलिसांचा फायरिंगचा सराव चालतो. या सरावा दरम्यान ही बंदुकीची गोळी गावात आली असल्याचा गावकऱ्यांचा अंदाज आहे. तर सरावा दरम्यान फायरिंग मधील बंदुकीच्या गोळीची इतकी लांब रेंज नसते असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर बंदुकीची गोळी ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा तपास ते करीत आहे. फायरिंग एक्सपर्ट चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याचा उलगडा होईल. अहवालात असे काही आढळून आल्यास विंजासन टेकडी जवळील होत असलेल्या फायरिंगचा सराव बंद करावा लागेल असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. देऊळवाडा येथील मधुकर पारखी यांच्या घरातील लोक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असतानाच अचानक मोठा आवाज झाला. या आवाजाने गावातील लोक पारखी यांच्या घराकडे धावले. त्यानंतर एक बंदुकीची गोळी छताच्या टीनाला फोडून घरात शिरल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावकरी हादरून गेले. याची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी जाऊन बंदुकीची गोळी ताब्यात घेतली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा न झाल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment