इस्लामपूर:- कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामाचा वसा आणि वारसा दिवंगत डॉ.बाबुराव घोडके यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे जपला असे गौरवोद्गार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी काढले.ते इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ.बाबुराव घोडके यांच्या व्दितीय पुण्यस्मरणा निमीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले,डॉ.घोडके यांच्या पारदर्शक कामाचे प्रतिबंध आज घोडके कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीत दिसते.आपले संस्कार आणि संस्कृती विसरून कोणालाही पुढे जाता येत नाहीत
Dr. Baburao Ghodke Foundation's state level Ryotdhara award distribution ceremony concluded with great enthusiasm
यावेळी डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न झाले.
समाजात गौरवास्पद काम करणा-या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.त्यामध्ये श्री.डॉ.दिलीप बजरंग मगदूम,श्री.बबनराव अवघडी रानगे ,श्री.विलासराव कोळेकर, श्री.इंजी.दत्तात्रय शामराव माने व सौ.अनुराधा प्रभाकर देशमुख यांना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते अत्यंत आकर्षक सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
स्व. डॉ. बाबुराव घोडके (दादा) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त हा सोहळा संपन्न झाला. तसेच
रयतधारा प्रेरणा पुरस्कार श्री.अंबाजी तुकाराम कोळेकर,डॉ. शंकरराव आनंदराव माने,श्री. राजाराम बापू वाठारकर, श्री.संपतराव आकाराम ठोंबरे,श्री.बिराप्पा सिद्दप्पा चिकबिरे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील एम टेक मध्ये पुणे विद्यापीठात प्रथम आलेल्या अमेय अरुण घोडके याचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, कर्मवीर अण्णांनी डॉ.बाबुराव घोडके यांचेवर जी जबाबदारी सोपवली ती त्यांनी समर्थपणे सांभाळली.ख्यातनाम साहित्यिक दि.बा.पाटील म्हणाले,कर्मवीर भाऊराव पाटील यांची विचारधारा.. रयतधारा हा एक मैलाचा दगड ठरेल.हे पुस्तक समाजाचे झाले आहे.ते वैचारिक प्रगतीचे द्योतक झाले आहे.त्यांच्या निष्ठा,तळमळीला सलाम करावासा वाटतो.आज जी प्रा.घोडके सरांची जी चौफेर प्रगती झाली ती दादांमुळेच झाली.प्रा.दिपक स्वामी यांनी सभागृहास मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रम मातोश्री हॉल, दत्तटेकडी जवळ, कामेरी रोड, इस्लामपूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पुरस्कार प्राप्त सौ.अनुराधा देशमुख म्हणाल्या, स्व. डॉ. बाबुराव घोडके (दादा) यांचे चिरंजीव श्री अरुणराव घोडके, जे स्वतः इतिहासकार आहेत, त्यांनी "रयत धारा " हे आपल्या वडिलांवर चरित्र लिहिलेले आहे. त्यांचे वडील स्व. घोडकेसाहेब (दादा )आदरणीय कर्मवीर अण्णांबरोबर त्यांनी आपला काही काळ घालवला आहे. आदरणीय कर्मवीर अण्णांच्या मूल्यांचा त्यांच्यावरती ठसा होता. रयत धारा या पुस्तकामध्ये आदरणीय कर्मवीर अण्णांचे कितीतरी किस्से, दुसरीकडे कुठेही लिहिलेले नसलेले, आपणास वाचावयास मिळतात. अतिशय ओघवत्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक एकदा वाचायला हातात घेतल्यावर वाचून संपल्याशिवाय आपण खाली ठेवत नाही.
यावेळी व्यासपीठावर अन्य मान्यवर भरतेश गांधी,अजिंक्य कुंभार, विश्वासराव पाटील नाना, दि. बा.पाटील, प्रा.दिपक स्वामी,बळवंत सर,प्रा.अरुण घोडके,माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे, नगरसेवक खंडेराव जाधव (नाना), राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे चेअरमन प्रा.शामराव पाटील, माजी नगरसेवक अशोकराव देसाई, अजित ऐडगे, अशोकराव वीरकर,चंद्रशेखर तांदळे, मानसिंगराव मदने उपस्थित होते.
महेश मोरे,सुनील मलगुंडे, गणेश पाटील,प्रा.मंगेश इंगवले,श्रीधर वीरकर,बजरंग कदम,सज्जन नरळे,प्रणव जाधव,संतोष भिसे,सर्जेराव टकले,नामदेव मदने,अजित येडगे,रोहित डवरी, आदित्य घोडके,गणेश रेळेकर , अदिती घोडके, संभाजी घोडके यांनी या सोहोळ्याचे उत्कृष्ट संयोजन केले.उपस्थितांचे स्वागत इंजि.गणेश पाटील यांनी केले.प्रास्तविक प्रा.दिपक स्वामी व आभार सौ.जयप्रभा अरुण घोडके यांनी मानले.या सोहळ्याचे भारदस्त सुत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले.
0 comments:
Post a Comment