घाटंजी (तालुका प्रतिनिधी);- तालुक्यातील भांबोरा येथिल स्व. पारुबाई कवडूजी चव्हाण यांची दुसरी पुण्यतिथी होती.त्यावर अनाठायी खर्च खर्च करण्यापेक्षा चव्हाण परिवाराने अन्नदानाच्या माध्यमातून आर्णी येथिल स्व.मातोश्री सुशिलाबाई वृद्धाश्रमात स्वादिष्ट जेवण दुसरी पुण्यतिथी साजरी करून समाजापुढे एक आदर्श ठेवला.
Arni celebrated her death anniversary by donating food to the old age home.
पुण्यतिथीच्या निमीत्ताने घरी कार्यक्रमाचे आयोजन करून आप्तेष्ट यांचे सह इतरांना बोलावून पुण्यतिथी साजरी करून अनाठायी खर्च करण्यापेक्षा ज्यांना खरी गरज आहे.हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भांबोरा येथिल चव्हाण परिवाराने मागील पहिल्या पुण्यतिथी पासून वृद्धाश्रमात पुण्यतिथी साजरी करण्याचा संकल्प केला असून या वर्षी दुसरी पुण्यतिथी सुद्धा त्यांनी आर्णी येथिल स्व.मातोश्री सुशिलाबाई वृद्धाश्रमात जावून स्वादिष्ट भोजनदान दिले. यात या परिवाराने समाजाला एक आदर्श दिला आहे.या भोजन दानाने वृद्धाश्रमातील उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.यावेळी स्व. पारुबाई चव्हाण यांचे दीर प्राध्यापक गोपीचंद कनिराम चव्हाण यांचे सह त्यांचे मुले विनोद कवडुजी चव्हाण, विनिंद कवडूजी चव्हाण, मिलिंद कवडूजी चव्हाण सोबतच सर्वत्र सूनबाई नातवंड व आप्तस्वकीय मोठया संख्येने उपस्थित राहुन वृद्धाश्रमात भोजनदान देण्यास परिश्रम घेतले. या स्तुत्य उपक्रमाने भांबोरा गावासह घाटंजी तालुक्यात चव्हाण परिवाराचे कौतुक करीत आहे.या भोजन दानाने आम्हाला मोठा समाधान मिळाल्याचे चव्हाण परिवाराकडून सांगितल्या जात आहे.
0 comments:
Post a Comment