Ads

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी इम्रान खान

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख: येथील भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य इम्रान खान यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. याआधी इम्रान खान यांनी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा महामंत्री व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ही पदे भुषविली आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी पदोन्नती करण्यात आली आहे.
BJP Yuva Morcha Maharashtra State Secretary Imran Khan

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इम्रान खान यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीमध्ये नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी निवडीचे पत्र पाठवत इम्रान खान यांचे अभिनंदन केले आहे. यामुळे भारतीय जनता पक्षातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय जनता पक्षाचे विचार, ध्येयधोरणे तसेच पक्षाचे काम तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणार असल्याचे मत इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.

या निवडीबद्दल माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री सुधिर मुनगंटिवार, रमेश राजुरकर, आमदार बंटी भांगडिया, जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अतुल देशकर, तसेच राहुल पावडे, आशिष देवतळे, चंद्रकांत गुंडावार, अहेतेशाम अली, अफजल खान, करण देवतळे, अमित गुंडावार, प्रविण सातपुते, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे, सुनिल नामोजवार यांनी अभिनंदन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment