Ads

ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आमचा संकल्प - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :-ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथील विकासकामांना गती मिळाली आहे. सिदुर येथील विकासासाठी आपण जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मतदार संघातील ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाचा आमचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Our resolution for comprehensive development of rural areas - Mla.Kishore Jorgewar
सामाजिक न्याय विभागाच्या 30 लक्ष रुपयांच्या निधीतून सिदुर येथील विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी सिदुरच्या सरपंच्या मंजुषा मत्ते, उपसरपंच संजय गणफाडे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, मुन्ना जोगी, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्यांक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, नकुल वासमवार, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार, राजेंद्र कांबडे, पंढरी निमसटकर, माया निमसटकर, गोविंदा मोडक, कालीचरण कांबळी, रमेश शेलवटे, सुनिल मासीरकर, बंडू मासिरकर, प्रियंका शेलवटे, आशिष मासिलकर, हरिष वाटेकर, चंदा नांदेकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, शहराच्या विकासामध्ये ग्रामीण भागाचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपण ग्रामीण भागाला शहराशी जोडणा-या प्रमुख मार्गासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. लवकरच सदर कामांना सुरवात होणार आहे. सिदुर येथील विकास कामांसाठीही आपण जवळपास अडिच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथील विकासकामांना गती मिळाली आहे. आज येथे 30 लक्ष रुपयांच्या निधीतून सौंदर्यीकरणसह ईतर विकास कामे केल्या जाणार आहे. आताच बोरवेल आणि पांदण रस्त्याची मागणी करण्यात आली आहे. आपली ही मागणीही रास्त असून यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
आज या कामाचे भुमिपूजन पार पडले आहे. आता हे काम उत्तम दर्जाचे होईल यासाठी गावक-यांनी लक्ष ठेवावे. सदर काम वेळेत पूर्ण करुन ते लोकार्पित झाले पाहिजे यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment