Ads

घाटंजीत शिंपी समाजाने संत नामदेव महाराज जयंती उत्साहात केली साजरी.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या १५३ व्या जयंती निमित्त घाटंजी शिंपी समाजाच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Ghatanjit Shimpi Samaj celebrated Sant Namdev Maharaj Jayanti with enthusiasm.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपनिरीक्षक सिडाम साहेब, खाडे साहेब उपस्थित होते तर कार्यक्रम अध्यक्षस्थानी केशवराव सिंगेवार, प्रमुख पाहुणे विष्णुजी माकडवार, चंद्रशेखर नोमुलवार, अनंत नखाते, नामदेव गटलेवार, सौ. कविता संतोष कर्णेवार, राजु दीकुंडवार तथा घाटंजी शिंपी समाज अध्यक्ष सचिन कर्णेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रम सुरुवात संत शिरोमणी नामदेव महाराज चौक घाटी येथिल फलकाचे पुजन मा. कवडूजी पोटपील्लेवार,संजय दीकुंडवार यांचे हस्ते करुन वारकरी फुसेकाका यांना श्रीफळ व सेवा देउन करण्यात आली.तदनंतर शिंपी समाज भवन घाटी येथिल नियोजीत स्थळी रांगोळी, संगीतमय भजन पूजनाने व लहान मुलांच्या विविध संत वेशभुषातील पेहराव आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्दिप प्रज्वलन व संत नामदेव महाराज प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमास सूरवात झाली. मान्यवरांचे शाल श्रीफळ व संत नामदेव महाराज प्रतिमा,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रास्ताविक शिंपी समाज अध्यक्ष यांनी संत नामदेव महाराज चरित्र व जयंती सोबतच घाटंजीत सूरु असलेल्या अविरत समाज संघटन व शिंपी समाज संस्था कार्यकारिणी करत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. उपस्थित मान्यवरांनी ही आपली मते व्यक्त करत संत साहित्य,जयंती उत्सव निमित्ताने प्रत्येकाने एकसंघ होउन गुण्या गोविंद्याने संत परंपरा जपत समाजहित साधावे हे विचार केले.कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामधे, वैष्णवी कर्णेवार संगीत ,विपुल पोटपील्लेवार (आर्मी सेवा) आरव कर्णेवार, यश पोटपील्लेवार एल.एल.बी झाल्याबद्दल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन मान्यवर हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे मध्यंतरी मान्यवर मनोगतात यांनी समाज संघटन ही काळाची गरज असून शिंपी समाजाची धूरा ही युवा नेतृत्वाच्या हाती देत ज्येष्ठांनी जे पाऊल उचलले त्यामुळे युवकांना मार्गदर्शन सोबत मनोधैर्य वाढविणारे असून त्याबाबत संघटना अबाधित ठेवण्यासाठी चाललेल्या कार्याचे कौतूक केले.कार्यक्रम संचालन सुत्रबध पध्दतीत अमोल कर्णेवार त्यांना साथ देत प्रविण कर्णेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय दीकुंडवार, शंकर पोटपील्लेवार,बंडूजी बुर्रेवार,काशिनाथ नोमुलवार, पत्रकार संतोष पोटपील्लेवार उमेश अक्केवार,आशिष कर्णेवार, प्रिती नोमुलवार, प्रशांत राजुलवार, संजय दीकुंडवार, संदीप पोटपील्लेवार,बाबु पोटपील्लेवार, शाम गटलेवार, विठ्ठल सिंगेवार तथा इतरही शिंपी समाज संघटना पदाधिकारी यांनी मेहनत घेतली मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार संजय दीकुंडवार यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता महाआरती व भोजन करुन करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment