राजुरा :-नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा व श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यामानाने राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील जंगुगुडा येथील आदिवासी कोलाम बांधवांसोबत दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
Equal opportunity, equal justice and sustainable development are the need of the hour. - Suresh Yelkewad
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्ह्णून राजुरा वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्ह्णून संजना पर्वतराव आत्राम, सरपंच, ग्रा.पं.लक्कडकोट, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो तथा सचिव माजी विध्यार्थी संघ, शीला जाधव, सामाजिक कार्यकर्त्या, प्रकाश मत्ते, क्षेत्र सहायक, राजुरा, गंगाजी पाटील आडे, पवन मंदुलवार ,वनरक्षक, विजयकुमार जांभूळकर,नागपूर विभाग अध्यक्ष, मोहनदास मेश्राम, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, अनंत डोंगे, राजुरा तालुका अध्यक्ष,किरण हेडाऊ, महिला तालुकाअध्यक्षा,नेफडो, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे, विना देशकर, राजुरा शहर अध्यक्षा, बबलू चव्हाण, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष, आशिष करमरकर, नागपूर विभाग युवा अध्यक्ष आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राम देवतेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांना वृक्ष कुंडी भेट देण्यात आली. यावेळी बोलतांना सुरेश येलकेवाड म्हणाले सर्वांना समान संधी, समान न्याय आणि शाश्वत विकास ही काळाची गरज असून आदिवासी कोलाम बांधवांनी आपल्या संस्कृतीची जपवणूक करीत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन एका ठिकाणी स्थायी झाले पाहिजेत. विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजेत. बादल बेले यांनी दीपोत्सव साजरा करण्याचा उद्देश सांगत यापूर्वी जिवती तालुक्यातील खडकी, रायपूर,घोडणकप्पी तर राजुरा तालुक्यातील बघूलवाही, बापूनगर, जंगुगुडा येथे हा दीपोत्सव साजरा केला असून यानिमित्ताने आदिवासी कोलाम बांधवांना दिवाळी फराळ साहित्य किट, ब्लॅंकेट, नवीन कपडे, बिस्कीट, आदींसह तेथील गरजेनुसार साहित्य वाटप केले. मनोज तेलिवार यांनी त्यांच्या बोलीभाषेत संवाद साधला.शिला जाधव यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी शिला जाधव, विजयकुमार जांभूळकर,नरेंद्र देशकर, शंकरराव बुऱ्हाण यांचा शॉल, वृक्ष कुंडी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मेश्राम, चंद्रपूर जिल्हा युवती अध्यक्ष यांनी केले. प्रास्ताविक रजनी शर्मा, नागपूर विभाग अध्यक्षा, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती यांनी तर आभार प्रदर्शन मोहनदास मेश्राम यांनी केले. सुरेश व उमेश लढी यांनी त्यांचे वडील वसंतराव लढी यांच्या पुण्यतिथी निमित्य पाच फराळ किट दिल्या. यावेळी अनेक पदाधिकारी, संघटक, सदस्य यांनी स्वयं प्रेरणेने दीपोत्सव करीता सहकार्य करीत कार्यक्रमाच्या यशवितेकरिता अथक परिश्रम घेतले.

0 comments:
Post a Comment