Ads

सिंदेवाही शहरात उमेदची "दिवाळी सणाच्या खास निमीत्ताने" दिवाळी विशेष फराळ प्रदर्शनी व विक्री

सिंदेवाही :-उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती, सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने "दिवाळी सणाच्या खास निमीत्ताने" शासनामार्फत स्वयंसहायता समूहांना व्यवसाय करण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवीण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून दिनांक 06/11/2023 ते 11/11/2023 या कालावधीत स्वयंसहायता समूहांनी तयार केलेला दिवाळी फराळ व आकर्षक शोभेच्या वस्तू विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे.Umaid's "Special Diwali Festival" Diwali Special Snack Exhibition and Sale at Sindewahi City
दिनांक 07/11/2023 ला रोज मंगळवारला या प्रदर्शनीचा उद्घाटनिय सोहळा पार पडला.सदर
उद्घाटन मा. तीतरे मॅडम सहायक गट विकास अधिकारी, सदन मॅडम कृषी विस्तार अधिकारी यांचे हस्ते झाले सोहळ्याच्या प्रसंगी मान्यवरांनी सिंदेवाही वासीय जनतेला सदर दिवाळी फराळ व प्रदर्शनीचा लाभ घेण्यास सांगितले.सदर प्रदर्शनी स्टाल मध्ये समूहातील महिलांनी तयार केलेली विविध पदार्थ( विविध प्रकारच्या चकल्या, चीवळा, लाडू, बालुशाही) रांगोळी व इतर साहित्य विक्री करिता ठेवण्यात आले आहे. श्री विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक, उध्दव मडावी तालुका व्यवस्थापक, दिनेश जांभूळकर तालुका व्यवस्थापक, सविता उईके, आशिष दरडे, अमर रंगारी, शुभांगी धनबाते प्रभाग समन्वयक, हर्षद रामटेके, मयूर खोब्रागडे, प्रभाकर मानकर, मंगेश पोपटे, सचिन लोधे व समूहातील महीला यांनी सहभाग घेतला. जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनीला भेट द्यावे असे आव्हान उमेदच्या वतीने करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment