Ads

मोदींनी आपल्या मित्रांना श्रीमंत अनं शेतक-यांना लाचार बनविले

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-
केन्द्रातील मोदी सरकारचे शेतीविषयक धोरण शेतक-यांसाठी मारक ठरत आहे. त्यांनी अडाणी, अंबानी सारख्या आपल्या मित्रांना जगातील श्रीमंताच्या यादीत नेऊन बसविले तर दुसरीकडे देशातील शेतक-यांना मात्र लाचार बनविल्याची घनाघाती टिका कॉग्रेसचे राज्य सरचिटणीस देवानंद पवार यांनी केली. शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे आज सोटा मोर्चा काढण्यात आला, याप्रसंगी त्यांनी केन्द्र तसेच राज्य सरकारला धारेवर धरले.
Modi made his friends rich and farmers poor
Heavy criticism of Devanand Pawar in Sota Morcha of farmers
राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने लाखो हेक्टर शेतातील पिके संपुष्टात आली आहे. सरकार मात्र राज्यात एक लाख हेक्टर वरील पिकांना नुकसान झाल्याचे सांगत आहे. एकटया यवतमाळ जिल्हयात एक लाख 25 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी गांजा पिऊन नुकसानीची पाहणी करतात काय? असा प्रश्न देवानंद पवार यांनी उपस्थित केला. यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतक-यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीने कापूस, सोयाबिन, तुरीचे प्रचंड नुकसान झाले. आता शेतक-यांनी किडणी, लिव्हर विकले तरी ते कर्जाची परतफेड करु शकत नाही. सरकार मात्र पिक विमा कंपणीसोबत साटेलोटे करुन त्यांचे एजंट बनून मलीदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला. संपुर्ण राज्यात विदारक परीस्थिती असतांना सरकारने मात्र फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहिर केला. रोम जळत असतांना निरो फिडल वाजवित होता ही म्हण जगप्रसिध्द आहे. इकडे आपल्या राज्यात शेतकरी मरत असतांना सत्ताधारी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. राज्यातील खोके सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना शेतक-यांना वाचविण्यापेक्षा आपला पक्ष वाचविण्यात अधिक रस आहे. मंत्रालय, विधानभवन पुर्नविकास कार्यक्रमासाठी कोटयवधी रुपये खर्च करण्याची तयारी केली जात असतांना दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतक-यांना मदतीपासून कसे वंचीत करता येईल याचीही व्युहरचना आखली जात असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला. यवतमाळ जिल्हयात हलाखीच्या परीस्थितीने शेतकरी आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे जिल्हयाचे पालकमंत्री मात्र आपल्या मुलाच्या हट्टापायी शेतक-यांना मदत करायचे सोडून महागड्या गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात अधिक रस दाखवितात ही अत्यंत दुदैवी बाब असल्याची टिका सुध्दा देवानंद पवार यांनी केली. हातात सोटे घेतलेल्या शेतक-यांचा मोर्चा दुपारी 1 वाजता गिलाणी महाविद्यालयापासून निघून तहसिल कार्यालयावर धडकला. शेतक-यांनी सरकारविरोधी घोषणा देऊन परीसर दणाणून सोडला. मोर्चात शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, शैलेष इंगोले अध्यक्ष घाटंजी तालुका कॉग्रेस कमेटी, संजय डंभारे अध्यक्ष घाटंजी तालुका किसान कॉग्रेस, प्रा. विठ्ठल आडे, बाबा जाधव, कोच्च्या रेड्डी, गंगय्या रेड्डी, हेमंत कांबळे, सय्यद शब्बु, गजानन पातोडे, सुधीर महल्ले, पंकज मांडवगडे, रणजीत जाधव, जयवंत आडे, अमोल बेले, युसूफ पठान यांच्यासह हजारोच्या संख्येत शेतकरी सहभागी झाले होते. तहसिलदार शेलवटकर यांनी मोर्चा स्थळी येऊन निवेदन स्विकारल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

सोटा मोर्चाने वेधले लक्ष
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, सोयाबीनसाठी सरसकट हेक्टरी 50 हजार तर कपसासाठी 75 हजार रुपये मदत जाहीर करा, कापसाला प्रती क्विंटल 12 हजार रुपये तर सोयाबीनला 8 हजार रुपये भाव द्या, कापूस, सोयाबीन व सर्वच पिकांना पीकविमा जाहीर करा, लोडशेडींग पूर्णत: बंद करा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ दरमहा दोन हजार रुपये लागु करा, छत्रपती शिवाजी महाराज किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज माफीचा लाभ द्या, नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला 50 हजार रुपयाचा प्रोत्साहन निधी तात्काळ द्या, पीक कर्जासाठी लागू करण्यात आलेली सीबील ची (CIBIL) अट तात्काळ रद्द करा, जंगली जनावरांचा समूळ बंदोबस्त करा, पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली डुकरांना मारण्याचा परवाना द्या यासह विविध मागण्यांसाठी आज घाटंजी येथे शेतकरी हातात सोटे घेऊन रस्त्यावर उतरले. खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले असतांना शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपये, 5 रुपये, 35 रुपये अशी तुटपुंजी मदत जमा करण्यात आली. त्यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न करीत देवानंद पवार यांनी पर्याप्त मदत न मिळाल्यास सत्ताधारी नेत्यांना तसेच प्रशासनाला सोटे पडतील असा इशारा दिला आहे. आज या मोर्चाने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment