Ads

विदर्भ राज्य निर्मितीसाठी गडचिरोलीत निघणार विदर्भ निर्माण संकल्प प्रचार यात्रा

चंदपूर : विदर्भ मिळवू औदा असा संकल्प करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत विदर्भ आंदोलनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विदर्भ निर्माण संकल्प यात्रा काढण्यात येणार असून, गडचिरोली जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणाहून ही यात्रा निघणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक ॲड. वामन चटप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.Vidarbha Nirman Sankalp Prachar Yatra will start in Gadchiroli for the creation of Vidarbha state
पहिली प्रचार यात्रा १ डिसेंबररोजी सकाळी ११ वाजता अहेरीवरून निघणार आहे. अहेरी, ताडगाव, भामरागड येथे येऊन मुक्काम करेल, २ डिसेंबर रोजी भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आणि घोट अशी पोहोचेल. ३ डिसेंबर रोजी घोटवरून चामोर्शी मार्गे गडचिरोली येथे पोहोचेल. तर दुसरी संकल्प प्रचार यात्रा १ डिसेंबरलाच कोरची येथून निघणार असून, पहिला मुक्काम पुराडा येथे होणार आहे. २ डिसेंबर रोजी पुराडा,कुरखेडा, वडसा, आरमोरी येथे येऊन आरमोरीत मुक्काम होईल. ३ डिसेंबर रोजी आरमोरी, धानोरा व्हाया गडचिरोली येथे पोहोचेल. दुपारी ३ वाजता दोन्ही संकल्प यात्रा गडचिरोली पोहोचल्यानंतर येथे जाहीर सभा होणार आहे. या संकल्प प्रचार यात्रेचे नेतृत्व अरुण केदार, मुकेश मासुरकर, डॉ. रमेशकुमार गजभिये, राजेंद्रसिंह ठाकूर, घिसू पाटील खुणे, अरुण मुनघाटे, जुम्मन शेख, राजकुमार शेंडे, शालिक नाकाडे करणार आहेत.

गडचिरोलीतील जाहीर सभेला ज्येष्ठ पत्रकार तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ॲड. वामन चटप यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला किशोर दहेकर, मारोती बोथले, मुन्ना आवडे, रमेश नळे आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment