Ads

शरद जोगींवर कारवाई करा,अन्यथा राज्यभर आंदोलन."जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन.

चंद्रपूर:-गडचांदूर येथील नगरपरिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद सुरेश जोगी यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या कोरपना तालुका उपाध्यक्ष गणेश लोंढे यांना मारहाण केली,मोबाईल फोडला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.शरद जोगी यांना अटक करून गुन्हा दाखल करावा,अन्यथा महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 'राजेश सोलापन' यांनी दिली आहे.यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.Take action against Sharad Jogi, otherwise statewide agitation." District President Rajesh Solapan."
गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस{AP}चे नेते 'शरद सुरेश जोगी' यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या 'J-पॅलेस' नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली.यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी तथा कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार 'गणेश लोंढे' यांनी शरद जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून 'J-पॅलेस' बार मध्ये बोलवले.
दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी अगोदरच राजुरा येथील पत्रकार 'दिपक शर्मा' आणि नांदा येथील पत्रकार 'धनराज शेखावत' हे दोघे बसून होते.पत्रकार गणेश,यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत 'तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना,असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो', अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.मोबाईल फुटल्यामुळे जवळपास 20 हजाराचे नुकसान सुद्धा झाले.!प्रतिक्रिया देण्याच्या बहाण्याने बोलावून अशाप्रकारे मारहाण करतील याची पूसटशीही कल्पना गणेश यांना नव्हती.पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत शरद जोगीवर गुन्हा दाखल करून अटक करावी,अन्यथा ग्रामीण पत्रकार संघातर्फे महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.सदर प्रकरणी जातीने लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी यावेळी चर्चे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळीस ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांच्यासह जिल्हा महासचिव पुरुषोत्तम चौधरी उपाध्यक्ष अनिलजी देठे मार्गदर्शक धर्मेशजी निकोसे ,कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, सहसचिव प्रभाकर आवारी, कोरपना ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सैय्यद मुमताज अली, गणेश लोंढे उपाध्यक्ष गौतम काशिनाथ धोटे ,अनिल नीलकंठ गेडाम, प्रवीण चरणदास मेश्राम,जिवती तालुकाध्यक्ष शंकर चव्हाण ,उपाध्यक्ष सुग्रीव जी गोतावळे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment