Ads

ट्रॅक्टरच्या अपघातात चालकाचा मृत्यू.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-ट्रॅक्टरचे समोरचे एक चाक अचानक निघाल्यामुळे ट्रॅक्टर पलटले. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू झाला. Driver dies in tractor accident.
सदर घटना तालुक्यातील पावना- मोरवा या रस्त्यावर दिनांक 22 रोज शुक्रवारला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली. अतुल ज्ञानेश्वर पायघन, वय 28 वर्षे, राहणार मांगली असे या मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे मांगली गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.सदर ट्रॅक्टर गिट्टी भरून मोरवा रस्त्याने जात असता पावणा गावाजवळ ट्रॅक्टरचे समोरील एक चाक निखळून पडले. चाक निखळल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाले. यात अतुल ज्ञानेश्वर पायघन याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा येथे पाठविला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment