Ads

अभी ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है| अल्टिमेटम संपला बच्चू कडूंचा फोन गेला माणिकगड कंपनीत

कोरपना :-गेल्या सहा वर्षा पासून 40 कामगार बालाजी मार्केटिंग हे माणिकगड सिमेंट कपनित ठेकेदार पद्धतीवर कामगारांना काम देत होती मात्र दोन, तीन महिन्या पासून कुठलही काम कामगारांना देत नाही ठेकेदाराने व कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता सर्व कामगारांना कामावरून कमी केले गेल्या दोन तीन महिन्यापासून बेरोजगार असल्याने सर्व कामगारांनी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष बिडकर यंची भेट घेऊन आपबिती सांगितली.Abhi Ye To Trailer Hai Picture Abhi Baqi Hai The ultimatum is over. Bachu Kadu's call went to Manikgad company
सर्व कामगार बेरोजगार असून त्यांच्या जीवन मरण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे कळताच बिडकर यांनी सहाय्यक श्रम आयुक्त भारत सरकार यांची भेट घेऊन निवेदन दिले सोबतच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक युनिट हेड माणिकगड सिमेंट कंपनी, बालाजी मार्केटिंग ठेकेदार व पोलीस स्टेशन गडचांदुरला निवेदन देऊन कंपनी ठेकेदार व प्रशासन यांना १५ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यासोबतच काही कामगारांना घेऊन बिडकर यांनी माझी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली व कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून त्यांच्या कडून आठ दिवसात कामगारांना कामावर घेऊ असे आश्वासन कंपनीने दिले आहे असताना बच्चू कडू यांनी आठ दिवसात कामगारांना कामवर न घेतल्यास आम्हला कळवा असे कामगारांना सांगितले. सहाय्यक आयुक्त भारत सरकार चंद्रपूर यांनी विषयाचे गांभीर्य बघून कंपनीला पत्र देऊन कळविले की कामगारांना कंपनी बद्दल द्वेष निर्माण होणार नाही व कामगारांना कामावर घेण्यात यावे असे पत्र पाठविले.
निवेदन देऊन १५ दिवस होताच जिल्हा अध्यक्ष बिडकर यांनी कामगारांना घेऊन कंपनीच्या गेट वर धडक दिली कंपनीचे कोणतेही अधिकारी चर्चा करण्यास तयारी दाखवत नव्हते. अखेर बिडकर यांनी कंपनीचे दोन्ही गेट बंद करून कंपनीची आवक जावक बंद केली झोपेत असलेले अधिकारी खडबडून जागे झाले व युनिट हेड यांनी स्वतः फोंन करून चर्चा केली कंपनीने अजून एक महिना वेळ मागितला पण बिडकर यांनी एक महिना नाही तर ३१ डिसेंबर पर्यंत कंपनीला वेळ दिला १ जानेवारी ला कामगारांना कामावर नाही घेतले तर प्रहार स्टाईल ने १ जानेवारी२०२४ नंतर कोनते पण आंदोलन कंपनी परिसरात प्रहार कामगारांना घेऊन करेल. याला जबादार माणिकगड कंपनी, बालाजी मार्केटिंग, श्रम आयुक्त भारत सरकार चंद्रपूर यांची राहील असा इशारा बिडकर यांनी दिला
हे सर्व कामगार गेल्या सहा वर्षा पासून बालाजी मार्केटिंग या ठेकेदारा कडे ठेकेदार पद्धतीवर काम करीत होते कामा वरून कमी करणे वा काम न देणे याबात आधी नोटीस वा कोणतीही लेखी माहिती द्यावी लागते मात्र ठेकेदाराने असे काही ही केले नाही उलट सर्व कामगारांना काम देणे बंद केले यात सर्व कामगारनचा घर खर्च मुलाचं शिक्षणना खर्च आईवडिलांच्या आजारपणाचा खर्च घर भाडे व रोजच्या मूलभूत सुविधा भागवणे कठीण झाले असून आम्ही नेमक काय करायचं जगायचं कि, आत्महत्या करायची? असा प्रश्न कामगारांनी कंपणी ठेकेदार व प्रशासन यांना केला

आजच्या ट्रेलर मध्ये पंकज मनुसमारे, आशिष आगरकर अमोल पाचभाई , नंदकिशोर केळझडकर प्रवीण शिंदे, किशोर टोंगे संजू गोडे, प्रशात बुरान, सुरज शेंडे, , रविंद्र वडस्कर, महेश सोयाम, सुरेश केंद्रे, अनिल तासलवार, विशाल कामडे विकास ठाकरे, मनोज जुनघरे, आकाश पथाडे, करण तलवार, धोडीबा काचगुंडे , करनु सिडाम, प्रकाश शेरकी, शनश्वर चिमनकर, रमेश उरकुडे, मंगेश शेळके, अश्विन वाघाडे, प्रमोद जुनाघर, अक्षय जानवे, वसंता कामडे, प्रमोद तिरणकर, योगेश ठाकरे, राकेश उरकुडे, रोहीत सुरतेकर, आकाश कीचेकर, भारत आगेकर, समाधान पिदुरकर, अविनाश वाघमारे, रणजित केलाझडकर, व अन्य कामगार उपस्थित होते.
आता कंपनीने निर्णय घेते याच्या कडे कामगारासहित अनेकांचे लक्ष लागले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment