Ads

नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

(प्रशांत गेडाम)नागभीड- नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावावर मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला सांयकाळी ४.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद अर्जुन नान्हे वय-३० रा. नवानगर (नवखळा) ता.नागभीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.Death of the youth who went for fishing in a Ghodazari lake in Nagbhid
सविस्तर वृत्त असे की,नेहमीप्रमाणे घोडाझरी तलावात चार ते पाच व्यक्ती मासेमारीसाठी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. ट्युबवर बसून तलावात मासेमारीसाठी जाळे लावत होते. ते लावत असताना अचानक प्रमोद नान्हे यांचा तोल जाऊन जाळयात पडला. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती जवळील नागभीड पोलीस स्टेशनला देण्यात आली. लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास नागभीडचे पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment