Ads

न्याय हक्कासाठी अंगणवाडी सेविका,मदतनीस गोंडपिपरीत बेमुदत संपावर

गोंडपिपरी -महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती गोंडपिपरीच्या वतीने विविध मागण्या घेत गोंडपिपरी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे दि ८ (शुक्रवारी) १४२ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ठिय्या आंदोलन करून मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसिलदार शुभम बहाकर, प्रकल्प अधिकारी शरदपारखी यांच्या मार्फत पाठविण्यात आले. Anganwadi workers, helpers on indefinite strike in Gondpipari for justice
दुष्काळसदृश्य तालुक्यात असलेल्या अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषित बालके व गरोदर महिला यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार याच्यावर या संपाचा परिणाम जाणवला आहे.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी त्यांच्या प्रश्न सोडवावेत यासाठी प्रशासनाला नोव्हेंबर महिन्यात निवेदन दिले होते. परंतु त्यांच्या मागण्यावर कोणताही निर्णय न झाल्याने चार डिसेंबर पासून त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी त्यांनी मोर्चा काढून निवेदन दिले.या निवेदनामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आपिला मधील २५ एप्रिल रोजी ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी.शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारे वेतनश्रेणी,ग्रॅच्युईटी,भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा लाभ देण्यात यावेत.अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ताबडतोब भरीव मानधनवाढ जाहीर करावी. मदतनीस व सेविकांचे मानधन किमान १८ ते २६ हजारापर्यंत करावे.मानधन महागाई निर्देशांकाला जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी.अंगणवाड्यांसाठी किमान रु ५००० ते ८००० भाडे मंजूर करावे. आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे तरी हा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा. या मागण्या केल्या.दि १५ नागपुरात ठीय्या आंदोलन करनार असल्याची माहिती मंगला झाडे, मालंद धाबरडे,इंदिरा चणकापूरे,दिपाली मुंजनकर,प्रतिभा रामटेके,कुसुम खामनकर,मंदा चौधरी, अंजना झाड़े यांनी सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment