Ads

हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान 'एक दिवस एक आंदोलन' दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

चंद्रपूर: मागील अनेक वर्षात इको-प्रो च्या वेळोवेळी करण्यात आलेले आंदोलन व अद्याप प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील मागण्या संदर्भात आंदोलन/सत्याग्रह करीत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जनसामान्यांचे समर्थन मिळविण्यासाठी आणि व्यापक जनजागृती व्हावी हिवाळी अधिवेशन 2023 एकदिवस एक आंदोलन अश्या पद्धतीने संपूर्ण अधिवेशन काळात लक्षवेधी आंदोलनाची शृंखला सुरू करण्यात आलेली आहे.
'One Day One Movement' during Winter Session 2023 to demand fort conservation on the next day
या शृंखलेतील दुसऱ्या दिवशी, आज सकाळी 7:30 ते 10:00 दरम्यान प्रतिकात्मक आंदोलन करीत किल्ला संवर्धन विषयक मागण्याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी किल्ला भिंतीवर बसून बैठा सत्याग्रह केला. यावेळी इको-प्रो तर्फे सुरू असलेले किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक मार्गातील अडथळे दूर करीत पर्यटकांना सुरक्षित जाता यावे म्हणून परकोट भिंतीची दोन ठिकाणी दुरुस्ती त्वरित करावी, किल्ला भिंत व पुरातत्व विभागाने नव्याने बांधलेली संरक्षण भिंतिचे बांधकाम पूर्ण करण्यास त्या दरम्यानचे अतिक्रमण मुक्त करण्यास पंतप्रधान/मुख्यमंत्री आवास योजनेत घरे देण्यात यावे, किल्ला परकोट पासून शंभर मीटर पर्यंत बांधकामाची अट असली तरी बांधकाम होत असून यावर कुठलेही नियंत्रण नाही, नाहक नागरिकांना बांधकाम करताना त्रास होत आहे, यामुळे ऐतिहासिक स्मारक विषयी नकारात्मक भावना निर्माण होत असते, त्यावर उपाय म्हणून ही किल्ला परकोट भिंतीपासून बांधकाम ची 100 मीटर अट रद्द करून 3 ते 5 मीटर करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

हिवाळी अधिवेशन दरम्यान इको-प्रो कडून करण्यात येत असलेली आंदोलन/सत्याग्रह पुढील काळात व्यापक व तीव्र असे आंदोलन करण्याचे नियोजीत आहे. आणि महत्वाचे म्हणजे संस्थेचे "आपला वारसा आपणच जपुया" या मुख्य उद्देशपुर्ती करिता असून आपला नैसर्गिक वारसा (जल, जंगल, जमीन, नदी, तलाव, वन्यजीव) व ऐतिहासिक वारसा (गड, किल्ले, मंदिरे, स्मारक व समाध्या) यासोबत शेतकरी, गावकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे हिताचे प्रश्न करिता इको-प्रो चा लढा सुरू असून प्रत्येकांनी स्वतःची लढाई स्वतः लढावी, त्यांना प्रेरणा, स्फूर्ती मिळावी म्हणून सातत्यपूर्ण संयमाने लढे सुरू ठेवले पाहिजे म्हणून इको-प्रो चा लोकजागृतीकरिता लोकलढा सुरू आहे.

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन वारसा असलेला चांदागड किल्ला-परकोट जे इको-प्रो ने सतत 1020 दिवस स्वच्छता करीत किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक सुरू करीत स्थानिक पर्यटनाला एक दिशा दिली आहे. मात्र पुरातत्व विभाग व राज्य शासन कडून तसेच जिल्हा प्रशासन कडून स्थानिक पर्यटन विकास करिता अद्याप हवे तसे लक्ष दिले गेलेले नाही. एखादी संस्था जेव्हा निस्वार्थ भावनेतून व लोकसहभागातून काही करीत असेल तर त्यास आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे ठरते. या सात वर्षाच्या सातत्यपूर्ण कार्यात सतत पाठपुरावा करीत असलेल्या मागण्या संदर्भात आज किल्ला भिंतीवर बसून 'बैठा सत्याग्रह' तर श्रमदान करीत स्वच्छता सत्याग्रह करण्यात आले.

या आंदोलनावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरातत्व विभाग प्रमुख रवींद्र गुरनुले यांच्या नेतृत्वात अब्दुल जावेद, अभय अमृतकर, ओमजी वर्मा, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, कुणाल देवगिरकर, विजयहेडाऊ, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण, चंदू आदी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment