Ads

गुटखा बंदी फक्त कागदावरच प्रहार जनशक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष यांचा आरोप

गडचांदूर:-राज्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू,गुटखा इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असताना चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पान मटेरिअल,किराणा दुकानात याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.'विक्रेते मस्त, अन्न औषध प्रशासन पोलीस विभाग सुस्त'' Vendors are cool, Food and Drug Administration police department is sluggish' अशी परिस्थिती निर्माण झाली असून केवळ लहान तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करून आपले नाव मोठे करताना दिसतात मात्र मोठे व्यवसायिकांवर कुठलीही कारवाई करताना दिसत नसल्याचे आरोप करत तात्काळ तंबाखू गुटखा विक्री व विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करावी,अन्यथा प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे 'प्रहार' स्टाईलने आंदोलन करण्यात येईल,असा इशारा 'प्रहार'चे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी निवेदनातून दिला आहे.Gutkha ban only on paper, Prahar Jan Shakti Party district president alleges
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात,खुलेआम तंबाखू,गुटखा विक्री सुरू आहे.काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून सुगंधित तंबाखू विक्रीचे रॅकेट चालवत आहेत.यामुळे भविष्यात वादविवाद,भांडण,हाणामारी तसेच या तंबाखूजन्य पदार्थांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.यासर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून शहरात सुरू असलेल्या गुटखा,सुगंधित तंबाखू तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व विक्रेत्यांवर कारवाई करण्याची विनंती वजा मागणी प्रहार जिल्हाध्यक्ष बिडकरतर्फे यांनी केली आहे.यासंदर्भात जिल्हा औषध प्रशान अधिकारी,जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर, पोलीस निरीक्षक गडचांदूर, यांना निवेदन देण्यात आले असून कारवाईकडे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment