चंद्रपुर :-येथील उत्कृष्ट महिला मंच Utkrust women's forum तर्फे जेष्ठ नागरिक संघ रामनगर येथे 16 व 17 डिसेंबरला परिसरातील मातृशक्तिसाठी मी वक्ता होणारच ! या मथळ्याखाली दोन दिवशीय व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षक, लेखक, दिग्दर्शक जगदीश नंदूरकर, सेल्फ मेकअप, हेअरस्टाईल तज्ञ आयुषि भुते,स्त्रीरोग तज्ञ डॉ.ऋतुजा मुंधडा,प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञा जीवनकर, उत्कृष्ठ महिला मंच अध्यक्ष छबूताई वैरागडे यांची मंचावर उपस्थिती होती.Lessons taken by 'Mother Power' in personality development camp.
यावेळी उपस्थित मातृशक्तीला विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यात प्रामुख्याने भाषण कला,
स्तनाचा कर्करोग, मासिक धर्म,वेशभूषा, हेअरस्टाईल या विषयांचा समावेश होता.
16 डिसेंबरला होम मिनिस्टर (पैठणी गेम ) खेळाचे आयोजनही करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, डॉ , ऋतुजा मुंधडा, किरण बुटले,एड.कल्पना जमदाडे, तथा उत्कृष्ट महिला मंच अध्यक्षा छबूताई वैरागडे यांचेसह साक्षी कार्लेकर , प्रा स्नेहल बांगडे,मनीषा कंनमवार,प्रणिता जुमडे, पूजा पडोळे,सारिका भुते, अर्चना चहारे, वसुधा बोडखे , वैशाली कंनमवार , सरिता घटे, अभिलाषा मेडूलकर यांची उपस्थिती होती.
यशस्वीतेसाठी वैशाली कामडे, उज्वला हजारे, मंजुषा बावणे,वर्षा , पारवे, चंदा घोडमारे , कल्पना बळी, अर्चना येरने, लीला ताई पोटदुखे सरिता पोटदुखे, सुनीता दानी, नीलिमा रघाताटे,, रुपाली चिताडे, माधुरी पिंपळकर, सविता कुळे , विद्या रोडे , विधा बुरटकर , सुनीता उरकुळे यांनी परिश्रम घेतले.या 2 दिवसीय शिबिराचे संचालन माधुरी येरणे,पूजा पडोळे यांनी केले. दुसरे दिवशी संचालन प्रणिता जुमडे यांनी प्रा स्नेहल ताई बांगडे यांनी आभार मानले.
पैठणीची मानकरी ठरली अमिता जुमडे
शिबिराच्या दुसरीस दिवशी होम मिनिस्टर खेळात पहिला पुरस्कार अमिता जुमडे यांना पैठणी प्रदान करून देण्यात आला. सुचिता हजारे यांना दुसऱ्या तर डॉली पोटदुखे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुनम पोटदुखे,संगीता पराते यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला.
मातृशक्ती सक्षम असावी हेच ध्येय...छबु वैरागडे
आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहे.असे असले तरी सर्वांना सर्व येते असे नाही.बऱ्याच महिलांना समाजाचे ऋण फेडावेसे वाटते पण त्यांना वाव दिला जात नाही.मातृशक्तीचा व्यक्तिमत्व विकास झाला तरच त्यांना संधी मिळू शकते,मातृशक्ती सक्षम असावी म्हणून हे आयोजन करण्यात आले,असे प्रतिपादन उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्ष छबु वैरागडे यांनी केले.
0 comments:
Post a Comment