ब्रह्मपुरी :– ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येत असलेल्या तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील गोविदपुर बिटात सकाळच्या सुमारास गट न.१६५ सापेपार माल मधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पट्टेदार वाघ मृत अवस्थेत पडला होता.
सदर वाघ हा शिकारीच्या शोधात आला असून तो विहिरीत पडून मृत्यू पावल्याचा अंदाज वनविभागाने लावला.
आज दि. 24/12/2023 रोजी मुमताज अहेमद शेख गट न 165/1 मौजा सापेपार चक यांच्या शेतातील विहीरीत 1 वर्षा आतील वाघ (पिल्लु नर) मृतावस्थेत असल्याची माहिती प्राप्त होताच पी.एम. श्रीरामे वनरक्षक गोविंदपूर हे घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता. वाघ (पिल्लु नर) मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यास घटनेबाबत माहीती दिली. एस.बी. हजारे सहा. वनसंरक्षक (तेंदू), अती. कार्य. ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी व ए. आर. कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) तळोधी यांनी आपले अधिनस्त वनकर्मचाऱ्यांसह, (NTCA) चे प्रतीनीधी श्री बंडूजी धोतरे, श्री विवेक करभेकर मानव वन्यजीव संरक्षक ब्रम्हपुरी, व स्वाब नेचर केअर फाउंडेशन चे अध्यक्ष यश कायरकर मौकास्थळी पोहचून सदर घटनेची चौकशी केली असता. शेतातील विहीरीत वाघ (पिल्लु नर) मृतावस्थेत असत्याचे दिसले. मौकास्थळाचे पंचनामा करण्यात आले.
मा. दिपेश मल्होत्रा (भा.व.से) उपवनसंरक्षक ब्रम्हपूरी वनविभाग, ब्रम्हपूरी, मा. एस.बी. हजारे सहा. वनसंरक्षक (तेंदू), अती. कार्य. ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी व ए. आर. कन्नमवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) तळोधी यांनी आपले अधिनस्त वनकर्मचाऱ्यांसह, (NTCA) चे प्रतीनीधी बंडू धोतरे, विवेक करभेकर मानव वन्यजीव संरक्षक ब्रम्हपुरी, व स्वाब नेचर केअर फाउंडेशन चे अध्यक्ष श्री यश कायरकर यांच्या उपस्थितीत शवाचे शवविच्छेदन करण्याकरीता सावरगाव रोपवाटीका येथे आणण्यात आले. डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकरी, डॉ. कु. ममता वानखेडे पशुधन विकास अधिकरी ता.ल.प.स.चि नागभीड यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सावरगांव रोपवाटीका परिसरात शवाचे दहन करण्यात आले. व प्राथमीक वन गुन्हा नोंदवून पूढील तपास करीत आहे.
0 comments:
Post a Comment