Ads

माता महाकालीची मुर्ती देत आमदार किशोर जोरगेवार यांनी केले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे चंद्रपूरात स्वागत...

चंद्रपुर :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज चंद्रपूर दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी वन अकादमी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे माता महाकालीची मुर्ती देत चंद्रपूरात स्वागत केले यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचीही उपस्थिती होती.
MLA Kishore Jorgewar welcomed the Chief Minister, Deputy Chief Minister in Chandrapur by presenting the idol of Mother Mahakali.
यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त माजी नगर सेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजित शहा, तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार आदींची उपस्थिती होती.

आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे चंद्रपूरात आगमन झाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मोरवा विमानतळ येथे पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. नंतर वन अकादमी येथे माता महाकाली महोत्सव समीती आणि यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीची मुर्ती देत स्वागत केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment