Ads

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक, कृषी तसेच ओबीसी समाजासाठी महत्त्वाचे योगदान : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक, कृषी तसेच ओबीसी समाजासाठी महत्त्वाचे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रातील बहुजन व ओबीसी समाजाला जागृत करण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी त्यांनी प्रचंड लढा दिला. त्यांच्या कार्याची शक्ती आजही ओबीसी समाजात दिसून येते, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
Dr. Punjabrao Deshmukh's important contribution to education, agriculture and OBC society: Dr. Ashok Jivtode
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख जयंती आज (दि.२७) ला स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरी करण्यात आली.

विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य ज्यावेळी सुरू होते त्याच वेळी शिक्षण महर्षी श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांचे देखील कार्य सुरू होते. पूर्व विदर्भात चांदा शिक्षण प्रसारक मंडळाने ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविली. डॉ. पंजाबराव देशमुख हे चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्थान आहे, असा उजाळा डॉ. अशोक जीवतोडे यांनी यावेळी केला.

पंजाबराव देशमुखांच म्हणणं मराठा समाजाने ऐकलं असतं तर आज मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलन करण्याची गरज नसती पडली, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर म्हणाले.

यावेळी विदर्भवादी ओबीसी नेते तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा पदाधिकारी व ईतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मोठ्या संख्येने विद्यार्थी व समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रविकांत वरारकर यांनी केले तर आभार देवाळकर यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment