भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झाल्याची घटना दिनांक एक रोज सोमवारला पहाटेच्या वेळी उघडकीस आली. सदर घटनेनी संतप्त झालेल्या शहरातील बौद्ध बांधवांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त करीत या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत भद्रावती येथील तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर ऐतिहासिक बौद्ध लेणी टेकडीवर भगवान बुद्धाचा पुतळा होता. टेकडीवर हा पुतळा असल्याने तो सहजपणे दिसायचा. घटनेच्या दिवशी या परिसरात पहाटे फिरणाऱ्या काही व्यक्तींना हा पुतळा न दिसल्याने त्यांनी टेकडीवर जाऊन पाहणी केली असता पुतळ्याची तोडफोड झाल्याची आढळून आले. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहरातील बौद्ध बांधव सुद्धा घटनास्थळी जमा झाले.त्यानंतर नाग मंदिरापासून निषेध मोर्चा काढून शहरातील व्यापाऱ्यांना भद्रावती बंदचे आवाहन केले केले. त्याला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बौद्ध बांधवांतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करून या घटनेतील दोषी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निषेध मोर्चात शहरातील बौद्ध बांधव तथा महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.
0 comments:
Post a Comment