घाटंजी - आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ६ जानेवारी २०२४ रोज शनिवार ला पत्रकार दिनानिमित्त घाटंजी तालुका पत्रकार संघ व राष्ट्रीय सेवा योजना गिलानी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर व आगीत नुकसान ग्रस्थांना किराणा कीट चे वाटप आणि ज्येष्ठ पत्रकार यांचा सपत्नीक सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन गिलानी महाविद्यालयात करण्यात आले आहे.
हलाखीच्या परिस्थितीत जीवनमान जगत असताना पैस्या अभावी उपचार घेवू शकत नाही.अश्यातच त्यांचा आजार जडत जावून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.सोबतच दिवसेन दिवस रक्ताचा तुटवडा निर्माण होत चालल्याने वेळेवर गरजावंत रुग्णांना रक्त न मिळाल्यास जीव गमवावा लागतो.या बाबीचा सारासार विचार करून आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदांत दृष्टीकोन पुढे ठेवून भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ६ जानेवारी रोज शनिवार ला १० ते ३ वाजे दरम्यान करण्यात आले आहे.सोबतच काही दिवसापूर्वी आगीत संपूर्ण साहित्यासह अख्ख घर जळून गेले अश्याना किराणा कीट चे वाटप करण्यात येणार असून जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव कांबळे,चंद्रकांत ढवळे,बाळासाहेब ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. शहजाद हे राहणार असून उद्घघाटक म्हणून तहसीलदार विजय साळवे हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून घाटंजी न. प.मुख्याधिकारी अमोल माळकर, उपविभागीय अभियंता प्रमोद धांडे,घाटंजी पो. स्टे.चे ठाणेदार निलेश सुरडकर, गटविकास अधिकारी महेश ढोले, पारवा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रविण लिंगाडे,वनपरिक्षेत्र अधिकारी मनिष पवार,रणजित जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.धर्मेश चव्हाण, कृ. उ.बा.समितीचे सचिव कपिल चन्नावार,घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड, अनंतकुमार पांडे यांचे सह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. निरज कुंभारे हे राहणार आहे. या शिबिरात नेत्रतज्ञ डॉक्टराकडून मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना मोफत लेन्स व शस्त्रक्रिया केल्या जाईल.मोतीबिंदू शस्त्रक्रिया पात्र रुग्णांना भरतीची तारीख शिबिराच्या दिवशी किंवा संबधीत दवाखान्याला विचारणा करून सांगण्यात येईल. चस्मा लागणाऱ्या रुग्णांना अल्प दरात उत्तम चष्मे देण्यात येईल,रुग्णांना मोफत औषधी मिळेल.या सुवर्ण संधीचा लाभ गरजावंत रुग्णांनी घ्यावा याशिवाय जास्तीत जास्त रक्त दात्यानी या शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन अध्यक्ष महेन्द्र देवतळे,उपाध्यक्ष दिनेश गाऊत्रे,सचिव राजू चव्हाण यांचे सह पांडुरंग निवल,आकाश बुर्रेवार, सागर सम्मनवार,संतोष पोटपील्लेवार,अरुण कांबळे, विलास महल्ले,प्रशांत उगले, प्रेमदास चव्हाण,योगेश ढवळे,ओम ढवळे,प्रदीप वाकपैजन,मुकेश चिव्हाणे,कुणाल तांगडे,प्रविण जयस्वाल,रमेश मादस्तवार, सय्यद जावेद,आकाश नडपेलवार ,मोहन बद्दीवार, जितेन्द्र जूनगरे,
मलय्या खंदारे,नरेश चव्हाण, नारायण गटलेवार इत्यादी पत्रकार मंडळी कडून करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment