ब्रम्हपुरी (ता.प्र.) :आपल्या भागातील विद्यार्थी हे बहुगुणी आहेत. मात्र त्यांना अनेक उच्च शैक्षणिक संधीची माहिती नसल्याने ते वंचित राहतात. परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी जगभरात नामांकित शिष्यवृत्ती गुणवत्तेनूसार देण्यात येते. राज्य व केंद्र शासनाच्याही शिष्यवृत्ती योजना असून त्याचा लाभ ग्रामीण होतकरु विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. विद्यार्थांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारायला हव्यात. त्यासाठी रम, रमा, रमीपासून दूर राहत शाश्वत यश मिळवावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर ॲड.दीपक चटप यांनी केले.
Stay away from rum, rama, rummy for success!
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी दरम्यान सुरू असलेली उच्चशिक्षणाची 'शिक्षण यात्रा' पोहोचली. यावेळी देशविदेशातील नामांकित विद्यापीठे, त्यांची प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, फेलोशीप यावर ॲड.चटप यांनी मार्गदर्शन केले.
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात जिल्हा परिषद शिक्षण विभाग व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी दरम्यान सुरू असलेली उच्चशिक्षणाची 'शिक्षण यात्रा' पोहोचली. यावेळी देशविदेशातील नामांकित विद्यापीठे, त्यांची प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, फेलोशीप यावर ॲड.चटप यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणयात्रेचे समन्वयक अविनाश पोईनकर, पत्रकार राहूल मैंद, पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर, डॉ.वर्षा चंदनशिवे, प्रा.बालाजी दमकोंडवार, प्रा.निलिमा रंगारी, शिक्षण विभागातील अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 'संविधान दिन ते गणराज्य दिन' या दोन महिन्यांच्या कालावधीत विदर्भात सुरु असलेल्या 'शिक्षण यात्रा' मोहिम बाबत अविनाश पोईनकर यांनी भूमीका मांडत विदर्भातील विद्यार्थी आता देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेवून सामाजिक योगदान देण्याची भावना व्यक्त केली. अध्यक्ष स्थानाहून डॉ.खानोरकर यांनी विद्यार्थ्यांनी कलाशिक्षण व जीवनशिक्षणाकडे लक्ष द्यावे. विद्यार्थी हा ज्ञानकेंद्री व जे जे उन्नत ते ते स्विकारुन मार्गक्रमण करणारा असावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.बालाजी दमकोंडवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
•••
देश-विदेशातील या नामांकित विद्यापीठांची दिली माहीती
लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, सोएस, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन, क्विन मेरी युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, ऑक्सफर्ड, केंब्रिज आदी विदेशातीतील नामांकित विद्यापीठे तसेच अझीम प्रेमजी विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, राष्ट्रीय विधी महाविद्यालय, निर्मला निकेतन काॅलेज ऑफ सोशल वर्क, इंडीयन स्कुल ऑफ पब्लिक पाॅलीसी, इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, आयआयटी, आयआयएम, शिवनादर आदी देशभरातील नामांकित विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, नामांकित फेलोशीप याबद्दल माहिती देण्यात आली. पुढील काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेशासाठी सहकार्य करणार असल्याचे ॲड.दीपक चटप यांनी सांगितले.
•••
0 comments:
Post a Comment