Ads

जि प उ प्रा शाळा मोवाडा मो केंद्रस्तरीय क्रीडा सामने व बक्षीस वितरण सोहळा संपन्न

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-खेळ व कला संवर्धक मंडळ प. स.घाटंजी अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा सामने दि 04-01-2024 ते 06-01-2024 पर्यंत जि प उ प्रा शाळा मोवाडा मो येथे संपन्न झाले.
District UP Primary School Mowada Central level sports matches and prize distribution ceremony concluded
दि 04-01-2024 ला कार्यक्रमाचे उदघाट्न सावित्रीमाई च्या प्रतिमेचे पूजन करून व क्रीडा ध्वजाचे ध्वजरोहण करून झाले. कार्यक्रमा चे उदघाटक सौ प्रविणा दीपक राठोड (सरपंच, ग्रा प मोवाडा मो ) होत्या. अध्यक्ष स्थान हरिदास आम्ही अंबादास राठोड (अध्यक्ष शा व्य स ) प्रमुख अतिथी श्री प्रमोद गेडाम (उपसरपंच मोवाडा मो ), श्री संजय चंपत पेंदोर (उपाध्यक्ष शा, व्य स )सौ ललिता कृष्णनाथ बहेकार,( माजी सरपंच मोवाडा मो ), किसन किनाके (केंद्र प्रमुख मोवाडा मो )हे होते.. दि 04-01-2024 ला प्रक्रम ब ( वर्ग 6ते 8) मुले, कबड्डी, खो -खो, मुली लंगडी, कब्बड्डी, खो -खो हे खेळ घेण्यात आले. दि 05-01-2024ला प्रक्रम क ( वर्ग 1ते 5) यांचे खेळ घेण्यात आले. दि 06-01-2024 ला वैयक्तिक खेळ लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळी फेक, रनींग, कॅरम, बुद्धीबळ, टेनिकाव्वाईट, बॅडमिंटन ई खेळ घेण्यात आले. तिन्ही दिवशी विध्यार्थी, उपस्थित शिक्षक यांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. दि 06-01-2024 ला दुपारी 4.00 वाजता बक्षीस कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ प्रविणा दीपक राठोड (सरपंच मोवाडा मो ),प्रमुख अतिथी हरिदास अंबादास राठोड (अध्यक्ष शा. व्य. )प्रमोद देवाजी गेडाम (उपसरपंच मोवाडा मो ) संजय चंपत पेंदोर ( उपाध्यक्ष शा व्य स मोवाडा मो ) तुळशीदासजी आत्राम (माजी सैनिक ), सौ ललिता बहेकार (माजी सरपंच मोवाडा मो ), सौ जिजाबाई मेश्राम (पोलीस पाटील मोवाडामो ), किसन किनाके (केंद्रप्रमुख मोवाडा mo) नंदकुमार मिश्रा (मु वासरी ) हे होते. सांघिक खेळमध्ये विजेता उप विजेता संघाला शिल्ड व वैयक्तिक खेळमध्ये विजेता व उपविजेता खेळाडूंना मेडल मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. सांघिक व वैयक्तिक खेळमध्ये मोवाडा मो, टीटवी, मांडवा वासरी येथील शिल्ड व मेडल प्रदान करण्यात आले. प्रकम ब मुले कबड्डी, मुली लंगडी, क मुली कबड्डी, वैयक्तिक खेळमध्ये लांब उडी, उंच उडी, कॅरम, बॅडमिंटन, टेनिक्वईट, रनींग या खेळमध्ये मोवाडा संघ विजेता ठरला. खेळाचे उत्तम आयोजन व नियोजन केल्याबद्दल राजू उपरीकर (, मु मोवाडा मो ) यांचा शाल व फळ देउन मोवाडा मो केंद्राचे वतीने किसन किनाके (के प्र,) व उपस्थित मान्यवारांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन किनाके( के प्र ) राजू उपरीकर , सहायक शिक्षक नितीन मुद्देलवार, गणेश आत्राम, कु माया भेंडारकर, विषय शिक्षक कु सुरेखा राठोड, कु उज्वला शेंडे, व शाळा व्यवस्थापन समिती, ग्रा.पं. मोवाडा, गावकरी मंडळी आर्थिक व शारीरिक परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment