Ads

पत्रकार दिनी गिलानी महाविद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न..

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून घाटंजी तालुका पत्रकार संघ व राष्ट्रीय सेवा योजना गिलानी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक गिलानी महाविद्यालयात भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर त्याच सोबत आगीत नुकसान ग्रस्तांना किराणा कीटचे वाटप आणि ज्येष्ठ पत्रकार यांचा सपत्नीक सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. At Journalist Day Complete various programs in Gilani college.
पत्रकार दिनानिमित्त सर्व प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. ग्रामीण भागात हलाखीच्या परिस्थितीत जीवनमान जगत असणाऱ्या नेत्र रुग्णांना पैश्या अभावी वेळेवर उपचार घेता येत नसल्याने त्या रुग्णाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.ही अडचण लक्षात घेऊन पत्रकार संघाने मोफत नेत्र तपासणी व उपचार ठेवण्यात आले होते. यात शेकडो नेत्र रुग्णांनी लाभ घेतला.तर रक्त साठ्याचा दिवसेन दिवस होत असलेला तुटवडा त्यामुळे रुग्णांना येणारी अडचण समजून एक सामाजिक दायित्व जोपासत रक्तदान शिबिर घेण्यात आले यात ४१ रक्त दात्यानी रक्तदान केले.त्याच सोबत आगीत नुकसान ग्रस्तांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले आणि ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव कांबळे,चंद्रकांत ढवळे,बाळासाहेब ठाकरे यांचा सपत्नीक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.येथिल आयोजित रक्तदानात सर्व प्रथम घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अनंतकुमार पांडे यांनी सर्व प्रथम रक्तदान करून रक्तदानास सुरुवात करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. ए.शहजाद तर उद्घाटक म्हणून निवासी नायब तहसीलदार आर. व्ही.मेंढे,प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण लींगाडे, पारवा वनपरिक्षेत्राचे वनपाल धम्मानंद मेश्राम,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.निरज कुंभारे,वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पुराम, हे होते.तर नेत्र तज्ञ डॉ.विलास मुन,डॉ.तायडे, व रक्त संकलनासाठी डॉ.सोनू, डॉ. दहापुते,डॉ.आशिष राठोड,हे होते.यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या सत्कारावर विचार मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घाटंजी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेन्द्र देवतळे, उपाध्यक्ष दिनेश गाऊत्रे, सचिव राजू चव्हाण,यांचे सह पांडुरंग निवल, सागर सम्मनवार,संतोष पोटपिल्लेवार,अरुण कांबळे,विलास महलले, प्रेमदास चव्हाण, योगेश ढवळे, ओम ढवळे,मुकेश चिव्हाणे,कुणाल तांगडे,प्रविण जयस्वाल, रमेश मादस्तवार, सय्यद जावेद, मोहन बद्दीवार,नारायण गटलेवार जितेंद्र जुनघरे, मलय्या खंदारे,आणि गिलानी महाविद्यालय रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. सि. आर. कासार व प्राध्यापक वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुहास मोरे तर आभार प्रदर्शन अरुण कांबळे यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment