Ads

लोकमान्य विद्यालयात स्व.अण्णाजी गुंडावार जयंतीनिमित्य व्याख्यानमाला

भद्रावती(तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या येथील लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक अध्यक्ष स्व.निळकंठराव उपाख्य अण्णाजी गुंडावार यांच्या जयंतीनिमित्य लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. Lecture series on the occasion of Annaji Gundavar Anniversary in Lokmanya Vidyalaya
यंदा पार पडणाऱ्या जयंती समारोहाचे तथा १८ व्या व्याख्यानमालेचे उद्घाटन दि.१९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध व्याख्याते तथा नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अनिकेत सोनवणे, ठाणेदार बिपीन इंगळे, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, न.प. मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार, माजी सचिव मनोहरराव पारधे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी दयाशंकर तिवारी 'तुलसी के राम' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
दि.२० जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता संगीत रजनी या कार्यक्रमांतर्गत 'साज और आवाज' हा सुमधूर गीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे. वरोरा येथील रहेमत बाबा व संच हा गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक आमदार नागो गाणार उपस्थित राहणार आहेत. तर दि.२१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता व्याख्यानमाला कार्यक्रमांतर्गत 'मानवतेचा दीपस्तंभ-प्रभू श्रीराम' या विषयावर प्रखर विचारवंत आणि झी.टीव्ही.फेम प्रशांत ठाकरे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान,दि.१९ ते २१ जानेवारी पर्यंत संपन्न होणाऱ्या जयंती समारोहात लोकसेवा मंडळाचे सहसचिव तथा ऐतिहासिक शिवकालीन नाणी व वस्तू संग्राहक अमित गुंडावार यांच्या संकल्पनेतून भव्य शिवकालीन वस्तुसंग्रह प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शनी दि.१९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, दि.२० रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत व दि.२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली राहणार आहे.
दि.२२ ते २४ जानेवारीपर्यंत विद्यालयाचे स्नेहसंमेलन पार पडणार असून सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. व्याख्यानमाला, संगीत रजनी आणि शिवकालीन वस्तुसंग्रह प्रदर्शनीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार आणि लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment