Ads

खासगी शाळा शिक्षक संघाचे आज जि.प.समोर धरणे

चंद्रपूर : खासगी शाळेतील शिक्षकांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खासगी शाळा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालय जि.प.समोर सोमवार १५ जानेवारी रोजी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.Dharna of private school teachers union today in front of Z.P
अनुकंपा प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून वारंवार त्रुटी दाखविणे, मान्यता प्रकरणे प्रलंबित ठेवणे, मान्यता देण्यासाठी भ्रष्टाचार करणे, अनुकंपा प्रकरणात न्याय न देण्याची संस्थाचालक व शिक्षणाधिकारी यांची भूमिका याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे रेवतकर यांनी सांगितले. जिल्ह्यात जि.प. खासगी शाळेअंतर्गत अनुकंपाची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. मात्र, शिक्षणाधिकारी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अलीकडेच हिवाळी अधिवेशनात खासगी शाळा शिक्षक संघाच्या या मागणीला अनुसरून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यानंतरही माध्यमिक शिक्षणाधिकारी दखल घेत नसल्याने भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुतल्याचा आरोप रेवतकर यांनी केला आहे. धरणे आंदोलनात खासगी शाळांच्या शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रेवतकर यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला पुरुषोत्तम टोंगे, रवींद्र जेनेकर, किशोर दहेकर, रवींद्र पडवेकर, भाग्यश्री देशमुख आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment