Ads

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यातर्फे अजमेर शरीफ ला चादर रवाना.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-पवित्र अजमेर शरीफ येथे दिनांक 18 जानेवारीपासून हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्ला अलेह यांच्या 812 व्या उर्स ला सुरुवात होत आहे.या उर्स मध्ये चादर चढविण्यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे तर्फे पवित्र चादर अजमेर शरीफ साठी रवाना करण्यात आली. वरोरा येथील धानोरकर कार्यालयात ही चादर अजमेर उर्स साठी जात असलेले भद्रावती येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते गोरु थैम यांना ही चादर चढवण्यासाठी सुपूर्द करण्यात आली.A chadar was sent to Ajmer Sharif by MLA Pratibhatai Dhanorkar.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, मानस धानोरकर, पार्थ धानोरकर व प्रवीण काकडे उपस्थित होते. देशात सुख,शांती व समृद्धी नांदावी व देशातील ऐक्य कायम राहावे अशी कामना यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी केली.दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या कारकिर्दीत त्यांच्यातर्फे दरवर्षी अजमेर शरीफ येथील उर्स मध्ये चादर चढविण्यात येत होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ही चादर चढवण्याची परंपरा कायम राखली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment